India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिन्नरचा लाचखोर सहाय्यक निबंधक एसीबीच्या जाळ्यात; १५ हजार घेताना रंगेहाथ पकडले

India Darpan by India Darpan
March 2, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर येथील सिन्नर सहकारी संस्थेचा सहाय्यक निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. एकनाथ प्रताप पाटील (वय ५७) असे लाचखोराचे नाव आहे. १५ हजार ५०० रुपये घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पाथरे बुद्रुक येथे ई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे. पतसंस्थेने अनेक कर्जदारांना कर्ज दिले आहे.  त्यातील काही कर्जदारांनी कर्जाचे हप्ते थकवले आहेत. त्यामुळे पतसंस्थेतील थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावण्यासाठी कलम १०१ चे प्रमाणपत्र सहकारी संस्था निबंधकांकडून दिले जाते. या प्रमाणपत्रासाठी लाचखोर पाटील याने पतसंस्थेच्या वसुली विभागातील कर्मचाऱ्याकडे लाच मागितली. एका नोटीसचे १५०० रुपये असे १७ नोटीसचे एकूण २५ हजार ५०० रुपयांची लाच हवी असे लाचखोर पाटीलने स्पष्ट केले. याप्रकरणी अखेर एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि लाचखोर पाटील हा १५ हजार ५०० रुपये घेताना रंगेहाथ सापडला. याप्रकरणी एसीबीने पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

सापळा पथकामध्ये अभिषेक पाटील, पोलीस उप अधीक्षक, संदीप साळुंखे , पोलीस निरीक्षक,  सहा. फौजदार सुखदेव मुरकुटे, पो. ह. पंकज पळशीकर, पो.ना. मनोज पाटील यांचा समावेश होता. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, एन.एस.न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक आणि नरेंद्र पवार, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

एसीबीने आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

Nashik Sinner ACB Raid Corruption Bribe Crime


Previous Post

कॅन्टोन्मेंट निवडणुकांसाठी भाजपाच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा; बघा, कुणाकडे कोणती जबाबदारी?

Next Post

अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका; स्वतःच दिली माहिती

Next Post

अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका; स्वतःच दिली माहिती

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group