India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याने जिंकली रसिकांची मने; २६ जानेवारीपर्यंत घेता येणार लाभ

India Darpan by India Darpan
January 21, 2023
in साहित्य व संस्कृती
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घोड्यांच्या टापांचा आवाज… तलवारींचे ढालीवर पडणारे खणखणीत आवाज… लढाईचे चित्कार… तुतारीचे निनाद… छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेतील कलाकार डॉ. अमोल कोल्हे यांचे संवाद… यामुळे लोकप्रियतेच्या उंचीवर गेलेला हा कार्यक्रम नाशिककरांनी कायमचा स्मरणात ठेवला. पहिल्याच दिवशी भरगच्च गर्दीने उच्चांक गाठला. थंडगार वार्‍याच्या झुळकीचा सामना करीत हजारो शिवप्रेमींनी साधुग्रामच्या मैदानावर प्रचंड गर्दी केली. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या दर्जेदार अभिनयाला टाळ्या व शिट्ट्यांची दाद देत कार्यक्रमाने लोकप्रियतेचे टोक गाठले होते. नाशिकमध्ये झालेला आजपर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम झाला असावा, अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू होती

शिवपुत्र संभाजी महानाट्याची गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये डॉ. कोल्हे यांनी पूर्ण तयारी केली होती. लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांच्या या महानाट्यात शेकडो कलाकार सहभागी झाले. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच जयप्रकाश जातेगावकर कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करीत होते.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, रविंद्र सपकाळ, अभिनेत्री सायली संजीव, शेफाली भुजबळ, कल्याणी सपकाळ, जयप्रकाश जातेगांवकर, नानाजी निकुंभ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘सपकाळ नॉलेज हब’चे प्रमुख रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते शस्त्रपूजा करण्यात आली. जाणता राजा हा पहिला प्रयोग नाशिकमध्ये झाला होता. नंतर शिवाजी महाराजांच्या पूत्राचा पराक्रम पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे, असे मनोगत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. सुमारे तीन तास या महानाट्याने टाळ्या आणि शिट्यांनी दाद मिळविली. सर्वच कलाकारांनी जीव ओतून आपली कला सादर केली.

Nashik Shivputra Sambhaji Mahanatya Drama Started


Previous Post

ख्यातनाम डॉ. नरेंद्र वैद्य यांची रुग्णसेवा आता नाशिकमध्ये; गुडघे आणि सांधेदुखीच्या रुग्णांना मोठा दिलासा

Next Post

गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी चौकशीचे आदेश

Next Post
प्रातिनिधीक फोटो

गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी चौकशीचे आदेश

ताज्या बातम्या

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय! राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक गार्डनचे नाव बदलले

January 28, 2023

अतिशय गरीब घरातील या महिलेचा आवाज ऐका, तुम्हीही थक्क व्हाल! अभिनेता सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर (व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group