India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

घर खरेदी नोंदणीची सुविधा आता ‘सम्राट ग्रुप’च्या मुख्य कार्यालयातही; ग्राहकांसाठी सुविधा

India Darpan by India Darpan
February 23, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन मालमत्तेची ई- खरेदी नोंदणी उपक्रम सुरु केला, त्याद्वारे नाशिक जिल्ह्यातील पहिली मालमत्तेची ई- खरेदी नोंदणी ‘सम्राट अपना घर’ या प्रकल्पासाठी ‘सम्राट ग्रुप’च्या मुख्य कार्यालयात नाशिकचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे, दुय्यम-निबंधक अधिकारी, नाशिक 5- राजेंद्र आव्हाड, तसेच सम्राट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सुजॉय गुप्ता, इ. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

मालमत्तेची खरेदी नोंदणी आता ऑनलाइन आणि विकासकाच्या कार्यालयातच होत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि कष्ट वाचत आहेत. आधी मालमत्ता खरेदीची नोंद करणे हे ग्राहकांसाठी मन:स्ताप देणारे आणि वेळ घेणारे काम होते. मालमत्ता खरेदीची नोंद करण्यासाठी खरेदीदार आणि विकासक यांना दुय्यम-निबंधक कार्यालयात जावे लागायचे. तेथे कागदपत्रांची पडताळणी, खरेदीदार व विक्रेत्यांची छायाचित्रे, बोटांचे ठसे घेतले जात. ही वेळ घेणारी व किचकट प्रक्रिया होती. या सर्व प्रक्रियेत लागणारा वेळ आणि त्यामुळे होणारा मनःस्ताप ग्राहकास होतो. नियोजित वेळेतच ही सर्व कामे करावी लागायची, आणि दुय्यम-निबंधक कार्यालयात बरीच गर्दी असल्याने या सर्व गोष्टींची पूर्तता करताना गोंधळ उडणे स्वाभाविक होते.

या सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास करून महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेत मालमत्तेची ई- खरेदी नोंदणी हा उपक्रम सुरु केला. यासंदर्भात मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी नुकतीच बांधकाम व्यावसायिक, बँक प्रतिनिधी व संबंधित घटकांची बैठक घेऊन ई- नोंदणीसाठी करावी लागणारी प्रक्रिया समजावून सांगितली. ह्या उपक्रमास सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचीच परिणीती म्हणून १५ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी सम्राट ग्रुपच्या ‘सम्राट अपना घर’ ह्या गृहप्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील पहिली सदनिकेची ई- खरेदी नोंदणी यशस्वीरीत्या पार पडली. याप्रसंगी सम्राट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सुजॉय गुप्ता यांनी आनंद व्यक्त केला आणि हा उपक्रम बांधकाम क्षेत्रातील एक महत्वाचा बदल ठरेल अशी आशा व्यक्त केली.

पुढे बोलताना त्यांनी कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक यांचे विशेष आभार मानत महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आपले शासकीय व्यवहार अधिक सुरळीत आणि वेगात होऊन जनतेचा वेळ वाचेल, तसेच अनेक प्रश्न सुटतील असेही ते म्हणाले. सदर ई- खरेदी नोंदणीप्रसंगी ‘सम्राट ग्रुप’च्या मुख्य कार्यालयात कैलास दवंगे- मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक, राजेंद्र आव्हाड- दुय्यम-निबंधक अधिकारी, नाशिक, देविदास कोल्हे- सिस्टिम सपोर्ट इंजिनीअर, सुजॉय गुप्ता- व्यवस्थापकीय संचालक, सम्राट ग्रुप, सौ. श्वेता सुजॉय गुप्ता- कार्यकारी संचालक, सम्राट ग्रुप, अविनाश आव्हाड- संचालक, सम्राट ग्रुप, सुधीर मेटकर- सीओओ, सम्राट ग्रुप, कुणाल सोनवणे- लीगल हेड, सम्राट ग्रुप, विद्या शर्मा- संचालक, सीआरएम, सम्राट ग्रुप व ॲड. श्रद्धा पात्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Nashik Samraat Group E Registration Facility Started


Previous Post

दिल्ली महापालिकेत पुन्हा तुफान राडा! आप आणि भाजपचे आमदार भिडले; सभागृहात रात्रभर गोंधळ (व्हिडिओ)

Next Post

मुक्त विद्यपीठाच्या सर्व शिक्षणक्रमांमध्ये मोठा बदल; या वर्षापासूनच लागू होणार, दीक्षांत सोहळ्यात कुलगुरुंची घोषणा

Next Post

मुक्त विद्यपीठाच्या सर्व शिक्षणक्रमांमध्ये मोठा बदल; या वर्षापासूनच लागू होणार, दीक्षांत सोहळ्यात कुलगुरुंची घोषणा

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group