India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दिल्ली महापालिकेत पुन्हा तुफान राडा! आप आणि भाजपचे आमदार भिडले; सभागृहात रात्रभर गोंधळ (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
February 23, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीसाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये सुरू झालेला गोंधळ चक्क रात्रभर चालला. काही दिवसांपूर्वी दिल्ली महापालिकेच्या सभागृहात असाच राडा झाला होता. तेव्हा नगरसेवक सभागृहातील बाकांवर उभे राहून घोषणाबाजी करत होते. या प्रकाराला काही दिवस उलटत नाही तोच दुसरा प्रकार घडला आहे.

दिल्ली महापालिकेमध्ये मोठा राडा झाला आहे. बुधवारी दिवसभरात महापौर, उपमहापौर निवडणूकपार पडली. मात्र, स्थायी समितीच्या निवडीसाठी सायंकाळी सात वाजल्यापासून सुरु झालेला हंगामा गुरुवारी सकाळी सात वाजले तरी काही थांबलेला नव्हता. नगरसेवक, नगरसेविकांचा रात्रभर धिंगाणा सुरु होता. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की, हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली महापालिकेत सहा स्थायी समितींवरील सदस्यांची निवडणूकहोती. स्थायी समिती निवडणूक रोखण्यासाठी भाजप नगरसेवकांनी मतपेटीच चोरल्याचा आरोप आपच्यानेत्या आतिषी यांनी केला आहे.

Mcd councillors fighting – wish they would fight this much for the people of delhi pic.twitter.com/OVEMFnYfIL

— pallavi ghosh (@_pallavighosh) February 23, 2023

दिल्ली महापालिकेमध्ये सायंकाळपासून कार्यवाही सुरु होती. परंतू, भाजपाचे नगरसेवक कामकाजात बाधा आणण्यासाठी गोंधळ घालत होते. यामुळे वारंवार कामकाज थांबविण्यात येत होते. काहीवेळा १५ मिनिटांसाठी काहीवेळा तासाभरासाठी कामकाज तहकूब करण्यात येत होते. या काळात भाजपाकडून रघुपति राघव राजा रामचे नारे लावले जात होते. यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांसाठी मतदान घेता आलेले नाही. यादरम्यान दोन्ही बाजूकडून एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. मध्यरात्रीच्या सुमारास सभागृहाचे कामकाज पुन्हा तासाभरासाठी स्थगित करण्यात आले होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की, हाणामारी झाली. यामध्ये महिला नगरसेविकाही एकमेकींना भिडल्या.

यांनी केले हाणामारीचे नेतृत्व
आम आदमी पक्ष रात्रीच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड व्हावी म्हणून ठाम राहिला होता. सिविक सेंटरबाहेर भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांची जमवाजमव सुरु झाली होती. राज्यसभा खासदार संजय सिंह आपचे नेतृत्व करत आहेत, तर विजेंदर गुप्ता भाजपचे नेतृत्व करत आहेत.

देखिए @MCD_Delhi में कैसी गुंडई और नंगई कर रहे हैं माननीय. सदन में एक दूसरे से मारपीट, गाली गलौज, बोतलबाजी और महिला मेयर @OberoiShelly पर हमला. भगवान न करे कि किसी के प्राणों को खतरा पैदा हो. @LtGovDelhi @ArvindKejriwal @msisodia @PMOIndia @JPNadda @SanjayAzadSln @AtishiAAP pic.twitter.com/nkF8NicVjj

— अतुल अग्रवाल | Atul Agrawal 🇮🇳 (@atulaum_) February 22, 2023

Delhi MCD Video Battle Aap BJP Corporators


Previous Post

सोशल व्हिडिओ व्हायरल होताच अभिनेता सोनू सूदने ‘त्या’ ग्रामीण युवकाला दिली ही मोठी ऑफर

Next Post

घर खरेदी नोंदणीची सुविधा आता ‘सम्राट ग्रुप’च्या मुख्य कार्यालयातही; ग्राहकांसाठी सुविधा

Next Post

घर खरेदी नोंदणीची सुविधा आता ‘सम्राट ग्रुप’च्या मुख्य कार्यालयातही; ग्राहकांसाठी सुविधा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group