नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रंगपंचमी उत्साहात रंग खेळण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तर तिवंधा चौकातील रहाड बंद करावी लागली. सकाळपासून रंगपंचमीला उत्साहाला सुरुवात झाली. ठिकठिकाणी रंगोत्सव साजरा केला गेला. पण, आज गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
नाशिकमध्ये पेशवेकाळापासून रहाडीची परंपरा जोपासली जाते आहे. रहाड़ीमध्ये डुबकी घेत रंग खेळला जातो. सकाळपासूनच तयारी केली जाते. रंगपंचमीला निमित्त शहरातील पाचही प्रमुख रहाडीमध्ये रंग खेळण्यास दुपारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यानंतर तिवंधा चौकात रंगपंचमी खेळण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. त्यानंतर चेंगराचेंगरीची होत असतांना पोलिस अॅक्सनमोडमध्ये आले. त्यानंतर त्यांनी सौम्यलाठीचार्ज केले.
अशी झाली रंगपंचमीला सुरुवात
आज रहाडीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर रहाडी प्रदक्षिणा मारून बोंब ठोकत डुबकीला सुरुवात झाली. तांबट लेनमधील रहाड दुपारी बारा वाजता खुली करण्यात आली त्यानंतर सर्व रहाडी सुरु झाल्या. या उत्साहात पंचवटीतील रहाडीत गुलाबी, गाडगे महाराज पुलाजवळ पिवळा, तांबट लेन आणि तिवंधा येथे केशरी- नारंगी रंग असे रंग होते.