India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इंडिगोकडून नाशिकचे जोरदार ब्रँडिंग; येत्या १५ मार्चपासून सुरू होणार विमानसेवा (Video)

India Darpan by India Darpan
March 12, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विमानसेवेबाबत अतिशय महत्त्वाची बातमी आहे. नाशिकहून आता गोवा अवघ्या दोन तासात गाठता येणार आहे. ते सुद्धा अवघ्या ३ हजार रुपयांच्या तिकीटमध्येच. देशातील अत्यंत आघाडीची आणि व्यावसायिकरित्या उत्तम सेवा देणाऱ्या इंडिगो कंपनीकडून येत्या १५ मार्चपासून कंपनीच्यावतीने गोवा, अहमदाबाद आणि नागपूर या तीन शहरांसाठी सेवा दिली जाणार आहे. या सेवेसाठी कंपनीकडून नाशिकचे जोरदार ब्रँडिंग केले जात आहे.

गेल्या तीन वर्षांपासून इंडिगो कंपनीची नाशिकला प्रतिक्षा आहे. आता इंडिगो कंपनीची सेवा सुरू होत आहे. इंडिगो कंपनीकडून नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जाणार आहे. इंडिगो कंपनीची सेवा अतिशय व्यावसायिक पातळीवर यशस्वी समजली जाते. त्यांचे आगमन नाशकात होत असल्याने आगामी काळात नाशिक विमानसेवेला मोठा वेग येणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

विमान तिकीट बुकींगसाठी – हॅप्पी व्हॅकेशन्स, कोकण पर्यटन – 0253-2313368, 7030894411

Come explore #Nashik with us starting 15th March. Book now https://t.co/LgZ9U2lkmQ #goIndiGo #6ETours pic.twitter.com/vEGh5htFgA

— IndiGo (@IndiGo6E) March 12, 2023

शहरात होर्डिंग आणि व्हिडिओ
नाशिक शहरात ठिकठिकाणी इंडिगोने विमानसेवेचे होर्डिंग लावले आहेत. त्याद्वारे विमानसेवेचा प्रचार आणि प्रसारही केला जात आहे. त्याचबरोबर इंडिगोने विशेष व्हिडिओही तयार केला आहे. हाच व्हिडिओ कंपनीद्वारे प्रमोट केला जात आहे.

सद्यस्थितीत या कंपनीची नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-नवी दिल्ली या दोन शहरांसाठीची सेवा सुरू आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता या कंपनीने आणखी तीन शहरांसाठी सेवा सुरू करण्याचे पत्र हवाई वाहतूक मंत्रालय आणि ओझर येथील नाशिक विमानतळ प्रशासनाला दिले आहे. विमानसेवा सुरू होण्यासाठी हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. तसेच, विमानतळाच्या ठिकाणी विविध सुविधा आणि सहकार्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

Introducing daily flights to Nashik from Ahmedabad, Nagpur and North Goa W.E.F. 15th March, 2023. Fares starting at ₹2,736. Book now https://t.co/FaTguuTbPi. #goIndiGo #Nashik #NewDestination #IndiaAt75 pic.twitter.com/AL9FAmOJrd

— IndiGo (@IndiGo6E) February 6, 2023

महत्त्वाची सूचना –
विमानसेवेच्या वेळेत बदल होऊ शकतो. त्यामुळे बुकींगवेळी योग्य ती खात्री करणे
पर्यटन बुकींगसाठी अत्यंत विश्वासार्ह आणि दर्जेदार संस्था
मा. श्री दत्ता भालेराव संचलित
हॅप्पी व्हॅकेशन्स आणि कोकण पर्यटन संस्था
पत्ता – तिबेटियन मार्केट, शरणपूर रोड, नाशिक
संपर्क – 0253-2313368, 7030894411
वेबसाईट – https://happyvacationsnashik.com/
https://kokankesari.com/

Nashik Air Service Branding Promotion from Indigo
Nashik Air Service Indigo Ticket Booking Started
Nashik Air Service New Year Gift New Cities Connection
Flight Indigo SpiceJet Ozar Ojhar Civil Aviation Goa
Bengaluru Hyderabad Goa Nagpur New Delhi Ahmedabad


Previous Post

न्यायालय परिसरात होळी कार्यक्रमात अश्लील नृत्य; उच्च न्यायालयाने दिले हे आदेश

Next Post

नाशिकमध्ये रंगपंचमी रहाडीत रंग खेळण्यासाठी तुफान गर्दी… पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज… अखेर रहाड बंद करण्याची वेळ

Next Post

नाशिकमध्ये रंगपंचमी रहाडीत रंग खेळण्यासाठी तुफान गर्दी... पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज... अखेर रहाड बंद करण्याची वेळ

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group