India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार

India Darpan by India Darpan
December 9, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मोहदरी घाटात दोन ते तीन कारमध्ये हा अपघात झाला असून त्यात ५ जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला.

नाशिक-पुणे महामार्गावर काल एसटी महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस दुचाकी, कार आणि एका एसटी बसवर धडकली. त्यानंतर या बसने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत २ जणांचा बळी गेला. ही घटना ताजी असतानाच आत नाशिक-पुणे महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ हा अपघात झाला आहे. संगमेनरकडून नाशिककडे स्विफ्ट डिझायर कार येत होती.  मात्र, या कारचा टायर अचानक फुटला. त्यावेळी कार भरधाव वेगात होती. त्यामुळेच ही कार अनियंत्रित झाली. परिणामी, डिव्हायर तोडून ही कार थेट पलिकडच्या रस्त्यावर गेली. यावेळी कारने समोरुन येणाऱ्या काही वाहनांना जोरदार धडक दिली. इनोव्हासह काही कारला ही जबर धडक बसली. या अपघातात स्विफ्ट कारमधील ५ जण ठार झाले आहेत. त्यात दोन युवक आणि तीन युवतींचा समावेश आहे. हे पाचही केटीएचएम कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते. तसेच, हे सर्व विद्यार्थी नाशिक शहरातील सिडको परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. हे सर्वजण विवाहासाठी गेले होते.

हा अपघात एवढा भीषण होता की क्षाणार्धात मोठा आवाज झाला आणि कार एकमेकावर आदळल्या. अपघात होताच महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तातडीने काही जणांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने सिन्नरच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या अपघातात वाहनांचा चेंदामेंदा झाला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याचे काम सुरू आहे. इनोव्हा कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत.  मृत विद्यार्थ्यांमध्ये हरीश बोडके, मयुरी पाटील, शुभम ताडगे (अन्य दोन मृतांची ओळख पटणे बाकी आहे) यांचा समावेश आहे. तर, गायत्री फड, साक्षी घाळा, साहिल वरके, सुनिल दत्तात्रय दळवी आणि अन्य काही जण जखमी आहेत. दरम्यान, जखमींमधील काही जणांची प्रकृती चिंतानजक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.

Nashik Pune Highway Major Accident 5 Deaths


Previous Post

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक? राज्य सरकारच्या हालचाली सुरू

Next Post

नवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी ‘इंडिया दर्पण’मध्ये लवकरच

Next Post
सौ दिपिका दुसाने
इंदिरानगर, नाशिक
इ मेल -  Dipikamore.19@gmail.com

नवी लेखमाला : नाशिकच्या महिलेने बुलेटवर केलेल्या देशभर प्रवासाची रोमहर्षक कहाणी 'इंडिया दर्पण'मध्ये लवकरच

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group