India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक? राज्य सरकारच्या हालचाली सुरू

India Darpan by India Darpan
December 9, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण देशात वर्षभरात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे घडले आहेत. विशेषतः उत्तरप्रदेश, बिहार, नवी दिल्ली मध्यप्रदेश यासारख्या राज्यांमध्ये लव्ह जिहाद प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. त्यातच गेल्या महिन्यात मुंबई नजीकची रहिवासी श्रद्धा वालकर हिचा नवी दिल्ली येथील अफताब या तरुणाने अत्यंत अमानुषपणे निघृण खून करून तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले होते. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लव्ह जिहादचे देशभरात पडसाद उमटत आहेत. आता महाराष्ट्रात देखील लव्ह जिहाद प्रकरणी कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी होत असताना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या संदर्भात विधेयक मांडल्या जाण्याची शक्यता आहे.

येत्या दहा दिवसात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्ष यासंदर्भात विधेयक आणणार असून विरोधी पक्ष याबाबत काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश सारख्या राज्यांनी लव्ह जिहाद प्रकरणी कठोर कायदे केले असून आता महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचा कायदा होण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. १९ डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे.

कोरोनाकाळानंतर सुमारे ३ वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असल्याने या अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सदर अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. यापुर्वी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांच्यासह काही राज्य सरकारांनी कथित ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा केला आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असे या कायद्याचे नाव आहे. लव्ह जिहादची अशी अनेक प्रकरणे वेगवेगळ्या राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. त्यामुळे हिंदू समाजातील अनेक संघटनांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केलेले दिसून येतो, तसेच देशातील काही राज्यांमध्ये असे कायदे अस्तित्वात आहेत. तरीही असे गैरप्रकार वारंवार घडताना दिसून येतात.

आता श्रध्दा वालकर हत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या वर्षात देशभरात असे अनेक प्रकरणी घडली. या प्रकरणांत मुली अल्पवयीन असणे, खोटी ओळख सांगून विवाह करणे, खोटी कागदपत्रे सादर करणे, काही प्रभावशाली संस्थांकडून हस्तक्षेप अशा तक्रारी आहेत. आगामी विधानसभा अधिवेशना दरम्यान लव्ह जिहादविरोधी ‘धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२०’ आणण्याच्या तयारी राज्य सरकार आहे. यानुसार, जबरदस्तीनं धर्मांतरणाच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद असू शकते. त्यामुळे हे विधेयक अधिवेशनात चर्चेचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाजपाच्या अनेक आमदारांनी तसेच नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तसेच राज्यात लव्ह जिहादच्या काही घटना घडल्याच्या घटना घडल्याचा दावा भाजपाच्या आमदारांकडून केला जात होता. त्यातच श्रद्धा वालकर हिची हत्या हा लव्ह जिहादच असल्याचा दावाही केला जात आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे.

या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी भाजपाने तयारी सुरू केली आहे. तसेच हे लव्ह जिहादविरोधी विधेयक विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनामध्ये सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक मांडले गेल्यास हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तसेच या विधेयकाबाबत महाविकास आघाडी चे घटक पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण हे विधेयक आणल्यास जबरदस्तीने किंवा कोणत्याही मोहातून एखाद्याचे धर्मांतर करणे गुन्हा मानले जाईल.

Nagpur Winter Session Love Jihad Bill


Previous Post

‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट; संजनाचा संशय खरा ठरणार? कसा पचवणार अरुंधती हा मोठा धक्का ?

Next Post

नाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार

Next Post

नाशिक-पुणे महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात; नाशिकच्या कॉलेजमधील ५ विद्यार्थी जागीच ठार

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group