India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकच्या या प्रकल्पासाठी बजेटमध्ये १०० कोटी द्या; खासदार गोडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

India Darpan by India Darpan
February 23, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराचा विकास दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात शहरवासियांना पाणीटचाईची झळ पोहचू नये यासाठी गेल्या काही वर्षांपासून खा.गोडसे यांच्याकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. खा.गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला अहवाल पाठवत येत्या २०२३-२४ च्या आर्थिक बजेटमध्ये किकवी धरणासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणीचे पत्र पाठविले आहे. किकवी धरण तमाम नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून येत्या अल्पसंकल्पात धरणाच्या कामासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी असे साकडे खा.गोडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले.

सध्या नाशिक शहराला गंगापूर धरणातून पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे.गंगापूर धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता सुमारे ६ टीएमसी इतकी आहे.शहराची व्याप्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.यामुळे तात्कालिन सरकारने सन २०१० मध्ये किकवी धरण प्रस्तावित केले आहे . या धरणाच्या कामासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या,मान्यता यापुर्वीच जलसंपदा विभागाला मिळाल्या आहेत.मात्र निधी उपलब्ध न झाल्याने या धरणाचे प्रत्यक्ष काम अद्यातपावेतो सुरु झालेले नाही.परिणामी धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे.यातूनच आज खा. गोडसे यांनी मुंबई जात उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली.

किकवी धरणासाठी गेल्या काही वर्षांपासून आम्ही जलसंधारण विभाग तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे सततचा पाठपुरावा करत आहोत. यातूनच काही महिन्यांपूर्वी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपूर यांच्याकडे किकवी धरण विषयी सविस्तर अहवाल पाठविलेला असून आर्थिक बजेटमध्ये किकवी धरणासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केलेली असल्याचे खा. गोडसे यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. शहराची वाढती व्याप्ती विचारात घेता किकवी धरण विषयी महत्व खा.गोडसे यांनी फडणवीस यांना पटवून दिले. किकवी धरण तमाम नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून येत्या अल्पसंकल्पात धरणाच्या कामासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी असे साकडे खा.गोडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले.

Nashik Project 100 Crore Fund MP Godse


Previous Post

शेतकऱ्यांसाठी मोठी खुषखबर! राज्य सरकार पुन्हा राबविणार ही योजना

Next Post

नदी साक्षरतेसाठी अभिनेत्री हेमा मालिनी करणार नृत्य; मुंबईत भव्य सादरीकरणाचे आयोजन

Next Post

नदी साक्षरतेसाठी अभिनेत्री हेमा मालिनी करणार नृत्य; मुंबईत भव्य सादरीकरणाचे आयोजन

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group