नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सिडको परिसरात आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. सकाळच्याच सुमारास ही मोठी मोहिम राबविण्यात आली. सिडको परिसरातील उंटवाडी रोड येथे वाहतूक कोंडी होत असल्याने तब्बल १५० विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले.
पोलीस बंदोबस्तात सिडकोच्या विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला. गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण विभागाने आपली मोहीम सुरु केली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील अतिक्रमण काढले जात आहे. मध्यवस्तीतील शालिमार येथील दुकानांचे अतिक्रमण महापालिकेने गेल्या आठवड्यात काढले. त्यानंतर सातपूर कॉलनी परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर आता सिडकोकडे महापालिकेने मोर्चा वळविला आहे.
Nashik NMC Corporation Encroachment Drive