India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

५००, १०००, २००० नोटा बंद केल्यानंतर मोदी सरकार आणणार एवढ्या रुपयांचे नाणे… अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये

India Darpan by India Darpan
May 26, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील चलनातून ५००, १००० आणि २००० रुपयाच्या नोटा बंद केल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार आता ७५ रुपयांचे नाणे आणणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तशी घोषणा केली आहे. येत्या रविवारी संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त ७५ रुपयांचे नाणे जारी करण्यात येणार आहे. या नाण्यावर नवीन संसद भवन संकुलाचे चित्र छापण्यात येणार आहे. २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवन संकुलाचे उद्घाटन करणार आहेत.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसनुसार, ७५ रुपयांचे हे नाणे गोलाकार असेल आणि त्याचे क्षेत्रफळ ४४ मिमी असेल. या नाण्याच्या बाजूला २०० शिळे बनवण्यात आले आहेत. हे नाणे ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त मिसळून तयार केले जाणार आहे.

नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल आणि अशोकस्तंभही नाण्यावर कोरण्यात येईल. नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरी भाषेत भारत आणि इंग्रजीत भारत लिहिलेले असेल. त्याचप्रमाणे नाण्याच्या वरच्या बाजूला देवनागरी भाषेत संसद भवन लिहिलेले असेल आणि त्याचवेळी त्याच्या खाली संसद भवन संकुलाचे चित्र छापले जाईल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीनुसार करण्यात आली आहे.

१० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली होती. संसद भवनाच्या नवीन संकुलाच्या बांधकामासाठी ८६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता पण नंतर तो १२०० कोटी रुपये खर्च झाला. मात्र, संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबतही बरेच राजकारण होत आहे. खरे तर विरोधी पक्ष नवीन संसद भवन संकुलाचे उद्घाटन करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करत आहेत. यामुळेच २० विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या नवीन संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

संसद भवनाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन न करणे, राष्ट्रपतींना समारंभासाठी आमंत्रित न करणे हा देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दुसरीकडे भाजपचे म्हणणे आहे की, सभापती हे संसदेचे संरक्षक आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केले आहे. या मुद्द्यावर राजकारण करू नये.

Modi Government Will Launch New Coin Currency


Previous Post

IPL : आज पाऊस पडल्यास फायनलमध्ये कोण जाणार? मुंबई की गुजरात? असे आहे समीकरण

Next Post

उंटवाडी रस्त्यावरील तब्बल १५० विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले; नाशिक महापालिकेची मोठी कारवाई

Next Post

उंटवाडी रस्त्यावरील तब्बल १५० विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले; नाशिक महापालिकेची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

दुर्दैवी घटना….मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

September 26, 2023

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023

ब्राझीलच्या शिष्टमंडळाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट, या विषयावर झाली चर्चा

September 26, 2023

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनी, बाबनकुळे यांनी केले उदघाटन

September 26, 2023

कॅनडा – भारत तणाव…. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाले हे खळबळजनक वृत्त.. आता काय होणार…

September 26, 2023
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक… लग्नाचे आमिष… महिलेची फसवणूक… मुलाला ५० हजारात विकले

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group