योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे शिवारात आज दि- २३ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असून कसबे सुकेणे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पंचनामा करून सदरच्या बिबटयाला वनविभागाच्या विशेष वाहनातून निफाड येथे नेण्यात आले आहे.
कसबे सुकेणे शिवारात गेल्या काही दिवसांपासून अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले होते, तसेच या बिबट्याने या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव प्राण्यावर हल्ला चढवून त्यांना ठार केले होते , त्यामुळे या बिबट्याची मोठी दहशत या परिसरात होती. दरम्यान कसबे सुकेणे शिवारात बबलू परशराम खोडे, यूविका गौ शाळेच्या परिसरात खोडे, उगले, पेढेकर वस्तीवर गेल्या 1 महिन्यापासून धुमाकूळ घालत असलेला बिबट्या अखेर आज रात्री बारा वाजता जेरबंद झाला.
परवापासून पिंजरा लावला होता रात्री बारा वाजता पिंजऱ्यात अडकला. बबलू खोडे , संदीप खोडे, रविराज उगले यांच्या बांधावर (युविका गौ शाळा) हा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याचा संचार असल्याचे लक्षात आल्यांनतर शेतकऱ्यांच्या माहितीप्रमाणे निफाड वनविभागाने दि. २१ रोजी आठवड्यात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात आज दि २३ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात आल्यांनतर शेतकऱ्यांनी निफाड वनविभागाशी संपर्क साधला , त्यांनतर वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पंचनामा करून सदरच्या बिबटयाला वनविभागाच्या विशेष वाहनातून निफाड येथे नेण्यात आले आले.
Nashik Niphad Taluka Leopard Trap