India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मंत्र्यांचा थाटच न्यारा! साधीसुधी नाही तर चक्क सोन्याची उडवली पतंग

India Darpan by India Darpan
January 23, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संक्रांत आटोपली असली तरी देशभरात सध्या पतंगबाजीचा माहोल सुरू आहे. हौसेला मौल नाही म्हणत मोठमोठ्या रंगीबेरंगी, विविध आकाराच्या पतंग आकाशात उडविल्या जात आहेत. पण, कल्पना केली आणि कुणी विचारलेच की, सोन्याची पतंगही उडू शकतो का, सोन्याचा धागाही असू शकतो का?, तर त्याचे उत्तर नकारात्मकच आसेल. पण, हे खरेच आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये अशी हटके पतंग तयार करण्यात आली आहे. या पतंगची किंमत २१ लाखांच्या घरात आहे.

मेरठमध्ये झालेल्या इन्व्हेस्टर्स समिटमध्ये ही पसंत ठेवण्यात आली. येथे आलेल्या मंत्र्यांनाही सोन्याची पतंग उडवण्याचा मोह आवरता आला नाही. यूपी सरकारमधील एमएसएमई मंत्री आर के सचान यांनी सोन्याची पतंग असलेला स्टॉल पाहिला तेव्हा त्यांनीही सोन्याची पतंग उडविण्याची हौस भागवून घेतली.

सोन्याची पतंग उडवल्यानंतर मंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. जेव्हा मंत्र्यांनी या सोन्याच्या पतंगासोबत सेल्फी काढला तेव्हा मेरठचे जिल्हाधिकारी दीपक मीणा यांनाही सोनेरी पतंगासोबत सेल्फी घेण्यापासून राहवले नाही. मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी या इनोवेशनचे कौतूक केले. मंत्री आर. के. सचान म्हणाले की, त्यांनी अनेक पतंग पाहिले आहेत, पण सोन्याची पतंग पहिल्यांदाच पाहिली.

प्रजासत्ताक दिनी आकाशात घेणार भरारी
यंदा प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमी एकाच दिवशी आहे. हेच औचित्यसाधून त्या दिवशी सोन्याची पतंग मेरठच्या थापरनगरमध्ये उडवली जाणार आहेत. एकवीस लाख किमतीची ही पतंग पाहण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
७ कारागिरांनी १६ दिवसात घडवली पतंग
पतंग तयार करणारे सराफा व्यापारी अंकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनासाठी ही खास पतंग तयार करण्यात आली आहे. सात कारागिरांनी १६ दिवसांत ही सोन्याची पतंग तयार केली आहे. त्याची खासियत म्हणजे त्यावर सोन्याचा थर आहे. त्याचा धागा देखील सोन्याचा बनलेला आहे. सध्या या सोन्याच्या पतंगाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Gold Made Kite Minister Sachan Meerut


Previous Post

कसबे सुकेणे शिवारात बिबट्या जेरबंद; महिन्याभरापासून सुरू होता धुमाकूळ

Next Post

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती; बघा, संपूर्ण पत्रकार परिषद

Next Post

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती; बघा, संपूर्ण पत्रकार परिषद

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group