योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरा येथे अतिशय दुःखद घटना घडली आहे. शेतीतील द्राक्ष बागेचे काम आटपून घरी परतणाऱ्या आईच्या हातातील पाच वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने ओढून ओढून नेले. बिबट्याने या चिमुकल्याला घेऊन मक्याच्या शेतात जखमी केले. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी निफाड येथे पाठविण्यात आला आहे. आज रविवार दि. 29 रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती तालुका वर पसरतात संपूर्ण तालुका हळहळला आहे.
सविस्तर वृत्त असे की, म्हाळसाकोरे येथे दत्तू मुरकुटे यांच्या वस्तीवर सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथील शेतमजूर द्राक्ष कामासाठी आहेत. त्यातील एक कुटुंब द्राक्ष कामासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास आई निर्मलाही आपल्या ठिय्यावर परतत होती. यावेळी तिच्या कडेवर रोहन हिरामण ठाकरे (वय ७ वर्षे) हा मुलगा होता. याच दरम्यान मक्याच्या शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने थेट या महिलेच्या कडेवरील चिमुकल्यावर हल्ला केला. बिबट्याने मुलाला शेतात ओढून नेत त्याच्या गळ्याला गंभीर जखमी केले. यावेळी आई निर्मलाने जोरदार आरडाओरडा केला. आजूबाजूचे जवळपास 50 शेतकरी जमा झाले. शेतकऱ्यांनी मक्याच्या शेताकडे धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. यावेळी दत्तू मुरकुटे आणि पोलीस पाटील संपत नागरे यांनी सायखेडा पोलिसांना कळविले. घटनास्थळी सायखेडा पोलिस ठाण्याचे स.पो.निरीक्षक पी. वाय. कादरी, पो.ना. पवन निकम, तान्हाजी झुरडे यांनी तात्काळ दाखल झाले. पंचनामा करून पुढील कारवाई केली.
Nashik Niphad Taluka Leopard Attack Child Death