इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
ढोंगी साधू
विमानात एक ढोंगी साधू बसलेला असतो.
तो सर्व प्रवाशांना आणि हवाई सुंदरीला सांगतो
की मी मोठा योगी आहे.
मी थेट देवाशी बोलतो.
थोड्या वेळाने….
पायलट सर्व प्रवाशांना तातडीची सूचना देतो.
आपले विमान वादळामध्ये सापडले आहे.
सर्वांनी पॅराशूट घेऊन विमानाबाहेर तातडीने उड्या मारा.
हवाई सुंदरी ढोंगी साधू जवळ येते.
आणि म्हणते, बाबा, तुम्ही देवाशी बोलून आपला जीव वाचवा.
बाकीचे सगळे प्रवासी पॅराशूट घेऊन जीव वाचवतली.
कारण, एक पॅराशूट कमी आहे.
– हसमुख