India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धावत्या ट्रकवर कोसळल्या वीज तारा… ड्रायव्हर व हमालाचा मृत्यू… निफाड तालुक्यातील दुर्घटना

India Darpan by India Darpan
March 16, 2023
in स्थानिक बातम्या
0

निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील पालखेड ते दावचवाडी रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. लोंबकळणा-या विजेच्या तारा ट्रकवर पडल्याने यात शॉक लागून ट्रक ड्रायव्हर पारसनाथ गणपत पाल व हमाल विजय प्रल्हाद शिंदे या दोघांचा मृत्यू झाला. शेतात खत खाली करण्यासाठी ट्रक जात असतांना ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

दावचवाडी येथे गुरुवारी सकाळी ट्रक मुंबईहून शेणखत घेऊन पिंपळगाव बसवंत मार्गे दावचवाडी येथे आला. या ठिकाणी ट्रकचालकाने शेणखत खाली करण्यासाठी हमाल पप्पू सोमनाथ यादव व विजय प्रल्हाद शिंदे यांना गाडीमध्ये बसवले. त्यानंतर पालखेड शिवारातील शेतकरी बाळासाहेब आहेर यांच्या शेतात जात असतांना लोंबकळलेल्या वीजवाहक तारेचा ट्रकला धक्का लागला. त्यामुळे ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यात टायर फुटले व चालक व हमाल बाहेर फेकले गेले. तर दुसरा हमाल पप्पू यादव याने उडी मारल्यामुळे तो बचावला.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याअगोदर महावितरणकडे तक्रार करुनही लोंबकळणा-या विजतारा उचललेल्या गेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. या तारा वरती उचलाव्या अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. ट्रकच्या अपघातात मृत्यू होण्याच्या घटना घडत असतांना हा अपघात मात्र विचित्र होता. यात कोणतीही चुक नसतांना दोघांना आपला जीव गमावावा लागला.

Nashik Niphad Electric Wires Collapsed Truck 2 Deaths


Previous Post

योगगुरू बाबा रामदेव यांना दणका; २९ कोटींहून अधिकचे शेअर गोठवले

Next Post

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण… घमासान युक्तीवाद…. कुणाचे पारडे जड? ऐतिहासिक निकाल कधी लागणार?

Next Post

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण... घमासान युक्तीवाद.... कुणाचे पारडे जड? ऐतिहासिक निकाल कधी लागणार?

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group