नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स अससोसिशन “निमा” तर्फे २७ व २८ फेब्रुवारी २०२३ रोजी निमा बँक समिट २०२३ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन माहिती पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते आज निमा हाऊस येथे झाले. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक शैलेंद्र राजपूत, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे , उपाध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष आशिष नहार , मानद सचिव राजेंद्र अहिरे, निमा बँक समिटचे अध्यक्ष गोविंद झा, निमा बँक समिटचे समन्वयक डी जी जोशी, शशांक मणेरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निमा बँक समिट २०२३ चे समन्वयक डी .जी .जोशी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. निमा बँक समिट २०२३ चे अध्यक्ष गोविंद झायांनी निमा बँक समिट २०२३ प्रदर्शनाची सविस्तर माहिती देतांना उद्योजक व बँक यांना एकाच व्यासपीठावर आणून एकमेकांच्या गरजांची पूर्तता सोप्या पध्दतीने कशी करता येईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना बँकांच्या कार्यपध्दतीची माहिती , कर्ज व बँकेच्या विविध योजनांची माहिती मिळणे तसेच निमा बँक समिट २०२३ मध्ये बँकींग कोड -स्कोप आणि की फिचर्स , कमिटमेंट ऑफ बँकस् टुवर्ड्स एसएमई सेक्टर, लोन अप्लिकेशन अँड क्रेडिट असेसमेंट, फॉरेन एक्सचेंज सर्व्हिस, सिक युनिट्स अँड डिबेट रिस्ट्क्लचरिंग, सेंट्रल अँड स्टेट स्कीमस फॉर एसएमई – डीआयसी / एनएसआयसी, कम्प्लेट्स – बँकिंग ऑब्यूडसमन , क्रेडिट रेटिंग ,फायनान्शिअल रिपोर्टींग स्टॅंड्स याविषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले आहेत.
पॅनल डीसकशन – डीलिंग विथ बँकस् अँड माय एक्सपिरिअन्स विथ बँकस् या विषयावर चर्चासत्र आयोजित केल्याचे सांगितले . निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रास्ताविक करतांना म्हणाले की , सद्य परिस्थितीत करोना च्या नंतर उद्योगांची आर्थिक स्थर सुधारत असुन आणखी त्याच्यात आर्थिक स्तरात वाढ होण्यासाठी आणि उत्पादन करतांना वापरात येणारी यंत्रणा जागतिक पातळीवर वेगाने बदलत आहे. त्याप्रमाणे नाशिकच्या उद्योजकाला जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, उच्च दर्जाचे उत्पादन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत असणे आवश्यक असल्याने उद्योगांना कमीत कमी व्याजदरात कर्ज पुरवठा व्हावा, बँकांच्या विविध योजनांचा फायदा व योजना उद्योगांना समजाव्यात कार्यपद्धती समजावी यासाठी निमा बँक समिट आयोजित केले असुन त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे . निमा बँक समिट मध्ये राष्ट्रीय, सहकारी, नागरी सहकारी बँक, पतसंस्था व खाजगी वित्तीय संस्थांचा सहभागी होणार असल्याचे बेळे यांनी सांगितले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन “निमा” ने औद्योगिक क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा विकास मोठया प्रमाणात होतांना पाहिला व अनेक मोठ्या उद्योजकांना स्थानिक, राज्य , देश व आंतराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी उत्पादनाचा उत्तम दर्जा, वेळेत ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहचविणे आवश्यक असते . उत्पादनाच्या उत्पादनापासून ते बाजारपेठेत नेण्याच्या या सर्व प्रक्रियेत उद्योजकांची आर्थिक स्थिती भक्कम असणे आवश्यक असते. त्यासाठी उद्योजक विविध प्रकारे कर्ज स्वरूपात पैसा उभारतो. त्यासाठी बँकेत अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे ,बँकेत भेट देणे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . उद्योगांची हीच गरज ओळखून निमा बँक समिट २०२३ चे आयोजन केले आहे . बँकांना व उद्योजकांना एक सामाईक व्यासपीठ उपलब्ध करुन संयुक्तरित्या वाटचाल करता यावी हा निमा बँक समिटचा उद्देश आहे.
बँकांना व उद्योजकांना एका छताखाली आणुन एकमेकांच्या गरजांची ओळख करुन एकमेकांना कशाप्रकारे मदत करता येईल त्यादृष्टीने निमा बँक समिटचे २००९ व २०१३ चे यशस्वी आयोजन केले होते . निमा बँक समिटला मिळणारा प्रतिसाद व उद्योजकांना होणार फायदा लक्षात घेऊन यावर्षी २०२३साली निमा बँक समिट २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे . सद्य परिस्थितीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांची निकड पाहता निमा बँक समिटच्या माध्यमातुन निश्चितच बँक व उद्योजक एकत्र आल्याने दोघांचाही फायदा होणार आहे. बँक समिटमुळे उद्योग , रोजगार निर्मिती व बँकांचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळेल . निमा बँक २०२३ चे आयोजन दि . २७ व २८ फेब्रुवारी २०२३ असे दोन दिवस निमा हाऊस, सातपुर येथे करण्यात आले आहे
निमा बँक समिटच्या माध्यमातून उद्योजक व बँकामध्ये चांगला समन्वय साधला जाणार आहे . या उपक्रमाचा फायदा बँक व उद्योजक दोघानाही होणार असुन सगळयांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे
याप्रसंगी निमाचे खजिनदार विरल ठक्कर, जयंत जोगळेकर, रवींद्र झोपे ,राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत , वैभव जोशी, संजय सोनवणे, श्रीधर व्यवहारे , जितेंद्र आहेर, मनीष रावल, श्रीकांत पाटील, एस.के.नायर, सुधीर बडगुजर , सुरेंद्र मिश्रा , सतीश कोठारी पदाधिकारी उपस्थित होते निमा बँक समिट २०२३ प्रदर्शनात बँकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि निमा बँक समिटचे अध्यक्ष गोविंद झा, मानद सचिव राजेंद्र अहिरे , उपाध्यक्ष किशोर राठी ,खजिनदार विरल ठक्कर यांनी केले.
Nashik NIMA Bank Summit Industry Benefit