India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

…अन्यथा रस्त्यावर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन, शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

India Darpan by India Darpan
May 25, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग क्रमांक २४ मध्ये ठिकठिकाणी पावसाळी आणि ड्रेनेज लाईनचे चेंबर जमिनीत बुजले गेले आहेत, काही रस्त्याच्या वर आले आहेत, तुटले आहेत. ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत. ज्या भागात पावसाळी गटारीची लाईन नाही, तेथे पाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यास या पाण्यातच जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी, २५ मे रोजी महापालिका शहर अभियंता नितीन वंजारी यांना देण्यात आले आहे.

या प्रभागातील कालिका पार्क, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिकानगर, गोविंदनगर, सदाशिनगर, बडदेनगर, मंगलमूर्तीनगर, बाजीरावनगर येथे कॉलनी रस्त्यांलगत पावसाळी गटारीची लाईन टाकण्यात आलेली नाही. तेथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचते. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील होते. हे पाणी तुंबणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अस्तित्वात असलेल्या पावसाळी आणि ड्रेनेज लाईनचे चेंबर हे बर्‍याच ठिकाणी जमिनीत बुजले गेले आहेत, काही जमिनीच्या खूप वर आले आहेत, काही तुटले आहेत.

पावसाळ्यापूर्वी त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, वंदना पाटील, भारती देशमुख, प्रकाश दुसाने, प्रभाकर खैरनार, निलेश ठाकूर, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, विनोद पोळ, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, मगन तलवार, दीपक दुट्टे, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी केली आहे.

सिटी सेंटर सिग्नलवरील चेंबरचा धोका
गोविंदनगरकडून सिटी सेंटर मॉलकडे जाताना सिग्नलवरील चेंबरवरील ढापा पंधरा दिवसात तीनवेळा तुटला, दोनवेळा बदलला, आज तिसर्‍यांदा तुटला. चेंबरही फुटले आहे. चेंबरची दुरुस्ती करून त्यावर मजबूत ढापा टाकणे आवश्यक आहे. तुटलेल्या चेंबरमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अशी स्थिती राहिल्यास पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून सिग्नलवर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.


Previous Post

त्र्यंबकेश्वरच्या नरभक्षक बिबट्याला होणार ही गंभीर शिक्षा; इतिहासातील पहिलीच घटना ठरणार

Next Post

नाशकात विनयभंगाचे प्रकार वाढले… महिलेसह दोन मुलींशी लज्जास्पद वर्तन… तीन गुन्हे दाखल

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशकात विनयभंगाचे प्रकार वाढले... महिलेसह दोन मुलींशी लज्जास्पद वर्तन... तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात होणार हे सर्वेक्षण; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

June 7, 2023

श्री तुळजाभवानी देवीची मौल्यवान नाणी गायब असताना मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याच्या हालचाली

June 7, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

June 7, 2023

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group