नाशिक – प्रभाग क्रमांक २४ मध्ये कॅनॉलच्या जागेवर आर डी सर्कल ते बाजीरावनगर असा जॉगिंग ट्रॅक विकसित करा, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये गोविंदनगर रस्त्यावर आर डी सर्कलपासून बाजीरावनगर, मिलिंदनगरकडे जाणार्या रस्त्यालगत डाव्या बाजूला पाटबंधारे खात्याची कॅनॉलची जागा आहे. ही जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. शहरात अन्य ठिकाणी झाले त्याप्रमाणे या जागेवरही भविष्यात अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. महापालिकेने येथे वेळीच लक्ष केंद्रित करावे. जॉगिंग ट्रॅक विकसित केल्यास बाजीरावनगर, नयनतारा सिटी-१ आणि २, नवीन तिडके कॉलनी, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, गोविंदनगरसह परिसरातील रहिवाशांना त्याचा उपयोग होईल. गोविंदनगर येथील स्वर्गीय शिवराम वझरे जॉगिंग ट्रॅकप्रमाणेच आर डी सर्कल ते बाजीरावनगर हा नवीन जॉगिंग ट्रॅक विकसित करावा, त्यासाठी आवश्यक त्या पुढील उपाययोजना कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी, १४ जानेवारी २०२२ रोजी महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि शहर अभियंता नितीन वंजारी यांना देण्यात आले आहे.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, विनोद पोळ, अनंत संगमनेरकर, पोपट तिडके, नितीन तिडके, संजय तिडके, दिलीप दिवाणे, डॉ. पराग सुपे, नितीन रसाळ, निचल दंडवाणी, किशोर देवरे, हरिष पाटील, राजेंद्र कानडे, बाळासाहेब राऊतराय, सचिन राणे, मनोज वाणी, डॉ. शशीकांत मोरे, बापू आहेर, यशवंत जाधव, नीलेश ठाकूर, आशुतोष तिडके, वंदना पाटील, मीना टकले, उज्ज्वला सोनजे, प्रतिभा पाटील, निंबा अमृतकर, मनोज पाटील, दीपक ढासे, मनोज कोळपकर, आनंदा तिडके, बाळासाहेब दुसाने, वैभव कुलकर्णी, बापू महाले, मगन तलवार, राहुल काळे, दीपक दुट्टे, हरिष काळे, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी ही मागणी केली आहे.