डांगसौंदाणे- शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या लक्ष्यात घेता तालुक्यातील कोविड सेंटरची पाहणी करीत आरोग्य यंत्रणेला सुसज्ज राहण्याच्या सुचना उपविभागीय प्रांत अधिकारी बबन काकडे यांनी केल्या आहेत. आज तालुक्यातील पाहिले सुरू झालेले डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला त्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे -पाटील गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल महाजन यांच्यासह भेट घेऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील बेडची स्थिती व ऑक्सिजन सिलेंडर याची स्थिती जाणून घेत जास्तीत जास्त प्रमाणत लसीकरण करून घेण्याच्या सुचना आरोग्य कर्मचारीना केल्या. रुग्णालय प्रशासनाच्या पूर्वतैयारी बद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी वैद्यकीय अधिकारी शारदा गावित , प्रयोग शाळा तंत्रज्ञ महाजन आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती ज्योती महाजन, सायली निकम, आरोग्य कर्मचारी संतोष दुसाने, प्रवीण दुसाने, उपस्थित होते. यावेळी या भागात जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे व दुसरा डोस ८४ दिवसांच्या कालावधीनंतर तात्काळ देण्यात यावा आदिवासी जनतेचे प्रबोधन करुन मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
रुग्ण संख्या ३४ च्या आसपास
बागलाण मध्ये सध्या रुग्ण संख्या ३४ च्या आसपास आहे लोकांनी काळजी घेत लसीचे दोन्ही डोस घेतले पाहिजे सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क सॉनेटाइझरचा वापर करीत सुरक्षित अंतर पाळले पाहिजे येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढली तर शासकीय आरोग्य यंत्रणा कमी पडणार नाही या दृष्टीने तालुका प्रशासनाने पावले उचलली आहेत.
जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदार बागलाण
….
लसिकरणाला प्रतिसाद देत सहकार्य करा
आदिवासी बांधवांनी लसिकरणाला प्रतिसाद देत सहकार्य केले पाहिजे ज्यांनी दोन्ही डोस पुर्ण केले आहेत त्यांना बाधा जरी झाली तरी त्याची लक्षणे ही कमी जाणवतात व रुग्णालयात ऍडमिट होण्याची वेळ येत नाही.
पी .एस. कोल्हे, गटविकास अधिकारी बागलाण