बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रम…

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2024 | 3:57 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20241003 WA0414 2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासन औद्योगिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. उद्योगांना पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ७५ हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली असून राज्य परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

उद्योग विभागातर्फे येथील हॉटेल डेमोक्रॅसी येथे आज सकाळी ‘उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्योग मंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, उद्योजक धनंजय बेळे, संदीप सोनवणे, कांतिलाल चोपडा, अजय बोरस्ते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळे, सहसंचालक श्री. शेळके, कार्यकारी अभियंता श्री. पवार, व्यवस्थापक अतुल दवंगे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश आणि नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. पायाभूत सोयीसुविधा निर्मितीची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. त्याच अनुषंगाने विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. अंबड औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी व्यवस्थापनासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नाशिक औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल.

गडचिरोली जिल्ह्यास स्टील हब म्हणून विकसित करण्यात येत आहेत. त्यातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असून त्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आगामी काळात नाशिक जिल्ह्यात लवकरच मोठा प्रकल्प येईल, असेही त्यांनी सांगितले. कृषीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत असून मोठ्या उद्योजकांबरोबरच लघु उद्योगांनाही कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत. राज्यातून कोणताही उद्योग बाहेर गेलेला नाही. नवी मुंबईतील महापे येथे जेम्स ऍण्ड ज्वेलरी पार्क साकारण्यात येणार आहे.

खासदार श्री. वाजे म्हणाले, राज्याने औद्योगिक क्षेत्रात घेतलेली भरारी आनंदाची बाब आहे. उद्योग क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी विविध उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. गांधी म्हणाले, गेल्या दोन वर्षात राज्याने पुन्हा औद्योगिक क्षेत्रात भरारी घेतली आहे. नवनवीन उद्योग आले आहेत. उद्योगांचे सक्षमीकरण होत आहे. नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित होत आहेत. ही समाधानाची बाब आहे. उद्योजकांना सन्मान मिळवून देण्याचे काम शासनाने केले आहे. श्री. बेळे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. शासनाकडून उद्योजकांना सकारात्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळत आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मुळे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, उद्योग भरारी या उपक्रमाची संकल्पना मंत्री श्री. सामंत यांची आहे. राज्याने उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. नाशिक उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यांना या उपक्रमाचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रादेशिक अधिकारी श्री. गवळे यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील उद्योजक, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ट्रॅक्टर ट्रॅालीवर आदळल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post

गृहखात्याकडून अपेक्षा करणे व्यर्थ…आता आई अंबाबाईच्या हाती लेकीवाळींचे रक्षण…पुण्याच्या घटनेवरुन सुषमा अंधारे संतापल्या

India Darpan

Next Post
Sushma Andhare

गृहखात्याकडून अपेक्षा करणे व्यर्थ…आता आई अंबाबाईच्या हाती लेकीवाळींचे रक्षण…पुण्याच्या घटनेवरुन सुषमा अंधारे संतापल्या

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011