मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी खासदार स्व. वसंतराव पवार यांच्या कन्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
अमृता पवार या आर्किटेक्ट असून त्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या माजी सरचिटणीस निलीमा पवार यांच्या सुकन्या आहे. त्याचप्रमाणे त्या नाशिक जिल्हा परिषद सदस्या व गोदावरी अर्बन को. ऑप. बॅंकेच्या विद्यमान अध्यक्षा आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निलीमा पवार यांच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर अमृता पवार काहीशा नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद जिल्हयात वाढायला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या प्रवेश सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लोकसभेची जोरदार चर्चा
अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. पवार या नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी इच्छुक असून आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचा हा प्रवेश सोहळा महत्त्वाचा मानला जातो आहे. विशेष म्हणजे, भाजप आणि शिंदे गटाची सध्या युती आहे. आणि नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे नाशिकची जागा शिंदे गट लढविणार की भाजप असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमृता पवार यांच्या प्रवेशामुळे भाजपने नाशिक लोकसभेची तयारी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटातही पवार यांच्या प्रवेशामध्ये खळबळ उडाली आहे.
https://twitter.com/cbawankule/status/1635577412498104321?s=20
Nashik NCP Politics Amruta Pawar BJP Join









