India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विमानात सिगारेट ओढली… कोर्टाने २५ हजार दंड केला… आरोपी म्हणाला २५०रुपयेच घ्या… अखेर कोर्टाने दिले हे आदेश

India Darpan by India Darpan
March 14, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एअर इंडियाच्या विमानात सिगारेट ओढणे आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी प्रवाशाला न्यायालयाने तुरुंगात पाठवले आहे. न्यायालयाने आरोपीला २५ हजार रुपये दंड ठोठावला होता पण आरोपी फक्त २५० रुपये जमा करण्यावर ठाम होता. अखेर आरोपीला तुरुंगात पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. रत्नाकर द्विवेदी असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर एअर इंडियाच्या लंडन-मुंबई फ्लाइटमध्ये सिगारेट ओढणे आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावर आरोपीने न्यायालयाला सांगितले की, आयपीसी कलम ३३६ अन्वये २५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे त्याने ऑनलाइन वाचले होते. अशा स्थितीत आरोपीने २५० रुपये दंड भरण्याची तयारी दर्शवली मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत आरोपींची तुरुंगात रवानगी केली.

एअर इंडियाने एक निवेदन जारी केले होते की, प्रवाशाने फ्लाइटमध्ये सिगारेट ओढली आणि इतर लोकांशी गैरवर्तन केले. यावर विमानाच्या पायलटने आरोपी प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने पायलटचे ऐकले नाही. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आणि आता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

Legal Air India Passenger cigarette Court Penalty


Previous Post

अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अमृता पवार भाजपमध्ये; नाशिक लोकसभा लढवणार?

Next Post

विधानसभेत मंत्र्यांची अनुपस्थिती…. अजित पवार संतापले… अध्यक्ष नार्वेकरही नाराज झाले…. नेमकं काय घडलं?

Next Post

विधानसभेत मंत्र्यांची अनुपस्थिती.... अजित पवार संतापले... अध्यक्ष नार्वेकरही नाराज झाले.... नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group