India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अखेर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अमृता पवार भाजपमध्ये; नाशिक लोकसभा लढवणार?

India Darpan by India Darpan
March 14, 2023
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी खासदार स्व. वसंतराव पवार यांच्या कन्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

अमृता पवार या आर्किटेक्ट असून त्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या माजी सरचिटणीस निलीमा पवार यांच्या सुकन्या आहे. त्याचप्रमाणे त्या नाशिक जिल्हा परिषद सदस्या व गोदावरी अर्बन को. ऑप. बॅंकेच्या विद्यमान अध्यक्षा आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निलीमा पवार यांच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर अमृता पवार काहीशा नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद जिल्हयात वाढायला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या प्रवेश सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

लोकसभेची जोरदार चर्चा
अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. पवार या नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी इच्छुक असून आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचा हा प्रवेश सोहळा महत्त्वाचा मानला जातो आहे. विशेष म्हणजे, भाजप आणि शिंदे गटाची सध्या युती आहे. आणि नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे नाशिकची जागा शिंदे गट लढविणार की भाजप असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमृता पवार यांच्या प्रवेशामुळे भाजपने नाशिक लोकसभेची तयारी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटातही पवार यांच्या प्रवेशामध्ये खळबळ उडाली आहे.

LIVE | 📍मुंबई – LIVE | ज़ाहिर पक्ष प्रवेश https://t.co/0XtFCt9Tac

— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 14, 2023

Nashik NCP Politics Amruta Pawar BJP Join


Previous Post

केंद्र सरकारचा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दणका; महागाई भत्त्याबाबत घेतला हा निर्णय

Next Post

विमानात सिगारेट ओढली… कोर्टाने २५ हजार दंड केला… आरोपी म्हणाला २५०रुपयेच घ्या… अखेर कोर्टाने दिले हे आदेश

Next Post

विमानात सिगारेट ओढली... कोर्टाने २५ हजार दंड केला... आरोपी म्हणाला २५०रुपयेच घ्या... अखेर कोर्टाने दिले हे आदेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group