गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकात डिसेंबरमध्ये ४ दिवस भव्य प्रॉपर्टी एक्स्पो; अनेकांचे गृहस्वप्न साकार होणार

नरेडकोचा पुढाकार

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 3:47 pm
in इतर
0
IMG 20220824 WA0017 e1661336200698

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नरेडको प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ ठरणार नाशिक व नाशिक शहर वासियांसाठी पर्वणी, असे प्रतिपादन नाशिकचे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायोजित “नरेडको नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२२” च्या ब्रोशरचे अनावरण डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे हस्ते करण्यात आले. नरेडको नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २२ ते २५ डिसेंबर २०२२ असे ४ दिवस सकाळी १० ते रात्री ८ असे डोंगरे वस्तीगृह, गंगापूर रोड, नाशिक येथे नियोजित आहे. नरेडको नाशिकच्या उपक्रमाचे कौतुक शहर विकासाचा ध्यास असलेली अग्रणी संस्था म्हणून नरेडकोचे नाव व भविष्य उज्वल असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सदर प्रदर्शन नाशिक व नाशिक शहर वासियांसाठी पर्वणी ठरणार असून सर्व नाशिककर नागरिकांना यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले. कुठल्याही शहराची विकासवाढ होणे अपरिहार्य असून यात शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका, विविध संघटना व शहरातील नागरिकांनी योगदान देणे महत्वाचे असल्याचे सांगितले. नरेडकोच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन शहर विकासात आग्रही राहण्याची भूमिका मी नेहमी घेईन असे सांगितले.

नरेडको नाशिकची सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त नाशिक महानगरपालिका प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आयुक्तांनी शहर विकासाची भूमिका मांडताना नाशिक शहर सर्वोत्तम असून शहराची जडणघडण अतिशय उत्तम असून यात मूलभूत बदल न करता विकासाचा वेग सर्वसामान्य नागरिकांप्रती पोहचवण्याची हमी दिली. यासभेत नरेडको नाशिक तसेच असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिविल इंजिनियर, आर्किटेक्ट अँड इंजिनीअर असोसिएशन व प्रॅक्टिशनर असोसिएशन पदाधिकारी, सदस्य असे ११० जणांची उपस्थिती होती.

नरेडको नाशिक सदस्यांना भेडसावणाऱ्या खालील अडचणी मांडण्यात आल्या. यात प्रामुख्याने :-
महापालिकेत येणाऱ्या दैनंदिन अडचणी : – नरेडको नाशिक सदस्यांना महापालिकेत येणाऱ्या दैनंदिन अडचणी विषयी महापालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला एकत्रित बैठक घेण्याची विनंती करण्यात आली. यास तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी नाशिक महापालिकेच्या इतिहासात प्रथमच दर ३ महिन्यांनी सहा. संचालक नगररचना, कार्यकारी अभियंता व कार्यालयीन प्रमुख, नरेडको नाशिक, आर्किटेक्ट असोसिएशन व इंजिनियर संघटना यांची एकत्रित बैठक घेण्याचे निर्देशित केले. तसेच यासंदर्भात पहिली बैठक ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात येईल असे उपस्थितांना सांगितले.

बांधकाम परवानगी :- बांधकाम परवानगी जलदगतीने मिळविणेसाठी महापालिकेने प्रयत्न करण्याचे सुचविले असता. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उत्तर देतांना महापालिकेत ऑनलाईन प्रकियेचे दोन सॉफ्टवेअर उपलब्ध असून दोन्ही सेवा कार्यालयांची एकत्रित बैठक घेऊन तांत्रिक सुधारणा केल्या जातील व फाईल मंजूर होण्याचा अवधी कमी करू असे आश्वासित केले.

घरपट्टी व घरपट्टी नोंदणी प्रक्रिया :- कुठल्याही इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, नगररचना विभागाकडून त्या इमारतीचा कार्पेट एरिया आर्किटेक्ट/ वास्तुविशारद /इंजिनिअर / सुपरवायझर यांचेकडून घेऊन भोगवटा प्रमाणपत्र / दाखला देण्यात येतो. तरीही बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर घरपट्टी विभागाकडून पुन्हा विविध कागदपत्रे मागण्यात येतात. नरेडको नाशिकने आयुक्तांना विनंती केली की, महापालिकेचे नगररचना विभाग यांचेकडे सर्व माहिती उपलब्ध असते. जसे की इमारत नकाशा, कार्पेट एरिया यावर उपाय म्हणून नगररचना विभाग व घरपट्टी विभागाचा समन्वय साधून अडचण संपविली जाईल.

रिक्त भूखंड कर (vacant plot tax) :- रिक्त भूखंड कर हा महापालिकेत कमेन्समेंट, (बांधकाम परवानगी) अर्ज दाखल दिनांकापर्यंत लागू असावा अशी विनंती नरेडको नाशिकने केली असता, आयुक्तांनी इतर महापालिकांचा अभ्यास करून निर्णय घेण्याचे सूतोवाच केले.
नळ जोडणी:- बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणेकामी महापालिकेत अर्ज करतेवेळी नळजोडणी अर्ज व्यवस्था एकत्रित करावी अशी विनंती’ नरेडकोने केली होती. यांस प्रतिसाद म्हणून दोन्ही अर्ज एकत्रित स्वीकारून फास्टट्रॅक परवानगी देऊ असे आश्वासित केले.

वाहनतळ / पार्किंग कॉम्प्लेक्स :- नाशिक शहरात पार्किंगची मोठी समस्या असून वाहनतळ / पार्किंग कॉम्प्लेक्स उभारणे गरजेचे आहेत. यात प्रामुख्याने शिवाजी ग्राउंड, भालेकर ग्राउंड, महात्मा गांधी रोड येथील स्टेडियम, राजीव गांधी भवन येथे वाहनतळ / पार्किंग कॉम्प्लेक्स उभारण्यात यावीत. यांस माहिती घेत निर्णय घेऊ असे सांगितले.

Nashik Naredco Property Expo in December

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत; अमित शाह, जे पी नड्डांसह वरिष्ठांसोबत खलबतं

Next Post

मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी ग्राहकास केली बेदम मारहाण

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी ग्राहकास केली बेदम मारहाण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011