नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मा गांधी रोडवरील मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी एका ग्राहकास बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. मोबाइलचे कव्हर खरेदी न केल्यामुळे दुकानदाराने अरेरावीचा करत ही मारहाण केली. रहदारी असलेल्या भररस्त्यात हा प्रकार झाल्याने तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेची माहिती होताच पोलिस घटनास्थळी आले. मोबाइलचे कव्हर खरेदी करण्यासाठी करण्यासाठी गेलेल्या या तरुणाला कव्हर पसंद पडले नाही. त्यामुळे त्याने ते कव्हर घेतले नाही. यातून दुकानदाराने अरेराकी करत तुम आमचा वेळ का वाया घातवला अशी कुरापती काढली. त्यानंतर तेथील परप्रांतीय दुकानदारांनी गोळा होऊन युवकास दमदाटी करीत बेदम मारहाण केली.