शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Nashik Crime १) नाशकात तरुणावर प्राणघातक हल्ला २) मालेगावात शस्त्रास्त्रांसह तरुणाला अटक

by India Darpan
ऑगस्ट 7, 2023 | 1:05 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20230807 WA0114 e1691387473686


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील भांडणाची कुरापत काढून म्हसरूळ परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तरूणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून तो गंभीर जखमी आहे. जखमी तरुणाचे नाव गौरव थोरात आहे. गौरवला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

रात्रीच्या वेळी घडलेल्या या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण असून संतापही व्यक्त केला जात आहे. म्हसरूळच्या चाणक्यपुरीतील ही घटना आहे. या घटनेच्या माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर घटनेतील संशयित हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. नाशिकमध्ये गु्न्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. रोज खून, हल्लासह चो-यांचे प्रमाणही वाढले आहे. शनिवारी गुन्हेगारीचा आढावा घेतांना पालकमंत्री दादा भुसे यांनी १५ दिवसांचे पोलिसांना अल्टीमेटम दिले होते. पण, दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.

मालेगावात शस्त्रास्त्रांसह तरुणाला अटक
शहरातील पवारवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुलशेर नगर मध्ये मोहम्मद अमीन नामक या तरुणांच्या घरी पोलिस इपअधिक्षक तेगबिर सिंह संधू यांच्या पथकाने छापा टाकत तलवार, चॉपर,कोयता अशी हत्यारे जप्त करुन तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ही हत्यारे त्याने कोठून व कशासाठी आणले याचा पोलिस तपास करीत आहे. मालेगाव शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून त्यात हत्यारे बाळगणा-या तरुणाला अटक झाल्यामुळे पोलिसांनी याचा कसून शोध सुरु केला आहे.

मालेगाव शहर हे संवेदनशील आहे. त्यामुळे या तलवारी, चॅापर व कोयता कशासाठी आणल्या हा प्रश्न आहे. जानेवारी महिन्यात याच भागात अजमेर येथून आलेल्या धारदार तलवारी, कुकरी, गुप्त्या असा शस्त्र साठा जप्त केला होता. अजमेर येथून हा शस्त्र साठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पवारवाडी पोलिसांनी म्हाळदे शिवारातील ब्रीज जवळ सापळा रचत परवेज आलम जमालुद्दीन या १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्या जवळील ८ तलवारी,५ कुकरी, ८ गुप्त्या, १० रॅम्बो चाकू अशी वेगवेगळी हत्यार जप्त करण्यात आली होती. आता याच भागात तलवार, चॉपर,कोयता अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

nashik malegaon city crime youth arrest attack police rural

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकचे एसपी स्वतः रस्त्यावर… एकाचवेळी तब्बल ३१ ठिकाणी छापे… केली ही मोठी कारवाई (व्हिडिओ)

Next Post

धक्कादायक… या कारणांमुळे होताय चित्त्यांचे मृत्यू… अफ्रिका, नाम्बियातल्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगून टाकलं…

Next Post
Cheetah

धक्कादायक... या कारणांमुळे होताय चित्त्यांचे मृत्यू... अफ्रिका, नाम्बियातल्या तज्ज्ञांनी स्पष्टच सांगून टाकलं...

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011