शनिवार, मे 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजपासून केवळ ३ दिवस उघडे राहणार हे मंदिर…. वर्षभर राहते बंद… हे आहे कारण

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2022 | 9:40 am
in इतर
0
FB IMG 1667876981437

 

आजपासून नाशिकच्या पंचवटीतील शनिचौकात असलेल्या कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक स्वामी महोत्सवास सुरूवात होणार आहे.
गेल्या आठ दहा वर्षांपासून कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. मधल्या दोन वर्षांत इतर मंदिरांप्रमाणे येथेही दर्शन बंद होते. परंतु यंदा सगळे निर्बंध उठल्याने कार्तिक स्वामी मंदिरात लोकं दर्शनासाठी गर्दी करतील अशी खात्री आहे.

vijay golesar
विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७

कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. कार्तिकेयांना दक्षिण दिशेचे स्वामी मानले जाते. कार्तिक स्वामींचं दर्शन महिलांनी घेऊ नये, तसेच हे मंदिर वर्षभर बंद असते फक्त कार्तिक पौर्णिमेलाच उघडते असे या मंदिराविषयी प्रवाद ऐकू येत असत. पण ते काही खरं नाही. कार्तिक स्वामींची सर्व मंदिरं वर्षभर उघडी असतात आणि स्त्रिया व पुरूष असा काही भेदभाव तिथे केला जात नाही. उलट दक्षिणेकडे कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी पुरूषां पेक्षा स्त्रियांचीच संख्या सर्वाधिक असते.

कालच पंचवटीतील शनि चौकातील कार्तिक स्वामी मंदिरात जावून आलो. कार्तिक स्वामींच्या नाशिकमधील जुन्या मंदिरांत या मंदिराचा समावेश होतो.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंचवटीतील कार्तिक स्वामी मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम दोन महिन्यांपूर्वीच पुर्ण झाले आहे. मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. गाभारा सुशोभित करण्यात आला आहे. मंदिरावर आकर्षक लायटींग करण्यात आली आहे. एकंदरीत मंदिर प्रसन्न वाटतेय .

श्री काशी नाट्टकोटाई नगर छत्रम मॅनेजिंग सोसायटीतर्फे या मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. गेली दोन वर्षे करोना निर्बंधामुळे हा महोत्सव साध्या पध्दतीने केला होता.यंदा मोठ्याप्रमाणात उत्सव साजरा करण्यासाठी मंदिर सज्ज झाले आहे.
कार्तिक पौर्णिमेनंतर दरवर्षी तीन दिवस कार्तिक स्वामी महोत्सव साजरा केला जातो. या काळांत कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले तर आर्थिक सुबत्ता वाढते. आरोग्य सुधारते. अडचणी दूर होतात अशी श्रद्धा असल्याने दर्शनेच्छुंची गर्दी दिवसेंदिवस वाढतेच आहे. कार्तिक स्वामींच्या मंदिरासमोर भाविकांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात.

संपूर्ण कार्तिक महिन्याला देवांनी अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. कार्तिक महिन्यात भगवान कार्तिक स्वामींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भगवान शंकर-पार्वतीचा ज्येष्ठ पुत्र आणि श्री मंगलमूर्ती गजाननाचा ज्येष्ठ बंधूचा मान लाभलेल्या कार्तिक स्वामींचे स्वतःचे वैभव वेगळे आहे. षडानन, मुरूगन, महादेवपुत्र, कार्तिकेय अशा विविध नावांनी या देवतेची ओळख आहे. दक्षिण भारतात कार्तिक स्वामींची अनेक मंदिरे आहेत. आता महाराष्ट्रात देखील गावोगावी कार्तिक स्वामींची असंख्य मंदिरं तयार झाली आहेत.

यावर्षी सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी कार्तिक पौर्णिमा सुरू होणार आहे. मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून ३२ मिनिटांपर्यंत पौर्णिमा असल्यामुळे या काळांत भाविकांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येईल. तसेच रात्री १ वाजून ३९ मिनिटांनी कृतिका नक्षत्र सुरू होईल ते बुधवार दिनांक ९नोव्हेंबर रोजी रात्री ३ वाजून मिनिटांपर्यंत असेल. या मुहूर्तावर देखील भाविकांना दर्शन घेता येईल.

यंदा भाविकांची गर्दी होईल या अंदाजाने मंदिरात प्रवेशांसाठी आणि बाहेर जाण्यासाठी बॅरिकेडस लावून स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आहेत. मंदिराबाहेर प्रसाद आणि मोराच्या पिसांची दुकाने सजली आहेत. पंचवटीतील शनि चौकातील कार्तिक स्वामी मंदिरा प्रमाणेच द्वारके जवळील ‘आयप्पा नवग्रह मंदिर’, सातपूर येथील कार्तिक स्वामी मंदिर तसेच विहितगाव येथील ‘आण्णा गणपती नवग्रह मंदिरात ‘ देखील कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.

Nashik Kartik Swami Temple open for only 3 Days
Kartik Pournima

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेता विशाल कोटियानचे अभिनेत्री टीना दत्तावर वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला ‘ही काय अंतर्वस्त्र….’

Next Post

चोरीच्या दुचाकी विक्री करणारे दोन जण गजाआड; दोन दुचाकी जप्त

Next Post
crime 1234

चोरीच्या दुचाकी विक्री करणारे दोन जण गजाआड; दोन दुचाकी जप्त

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011