शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेता विशाल कोटियानचे अभिनेत्री टीना दत्तावर वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला ‘ही काय अंतर्वस्त्र….’

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2022 | 5:31 am
in मनोरंजन
0
Fgojf5gacAA2opP

इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – ‘बिग बॉस’ हा शो छोट्या पडद्यावरचा अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो आहे. मनोरंजनाचा एक छोटा धमाकाच असतो. या शोमधील स्पर्धकांवर प्रेक्षक तसेच सेलेब्रिटी देखील आपली मते देत असतात. या शो मधील राडा हा प्रसिद्ध आहेच. सध्या ‘बिग बॉस’चा १६ वा सीजन सुरू आहे. बिग बॉसच्या घरात राडे, प्रेम अशा गोष्टी सुरू असतानाच आता प्रसिद्ध अभिनेता आणि ‘बिग बॉस १५’ चा सदस्य विशाल कोटियन याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या शो बाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या सीझनमधील सदस्य टीना दत्ताबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे आता विशाल कोटियनवर प्रेक्षक भडकले आहेत. तू आहेस कोण, असं म्हणत युझर्सनी विशालवर संताप व्यक्त केला आहे.

‘बिग बॉस सीजन १६’ मधील स्पर्धक टीना दत्ता हिने शालीन भानोतशी बोलताना आपण स्वतः एक ब्रँड असल्याचं म्हटलं होतं. टीना म्हणाली होती, “मी एक ब्रँड आहे. तरीही मी सौंदर्या शर्माच्या आधी घरातून बाहेर पडेन, असं तुला वाटतं का? सोशल मीडियावर तिचे सहा मिलियन फॉलोअर्स आहेत पण तिच्या पोस्ट कमी आहेत. आणि त्यावर फार कमी लोकांच्या कमेंट्स आहेत.” टीना दत्ताच्या याच बोलण्याचा धागा पकडत विशाल कोटियनने सोशल मीडियावर कमेंट केली आहे. त्याने ट्विटरवर टीना दत्ताबाबत एक ट्वीट केलं आहे. विशाल कोटियान म्हणतो, “टीना दत्ताला असं म्हणते की ती एक ब्रँड आहे. मला आश्चर्य वाटतंय की ती रुपा अंडरवेअर आणि बनियनची ब्रँड आहे का? ती शोमध्ये आली आहे आणि एखादी स्टार असल्यासारखी वागतेय. हा एक रिऍलिटी शो आहे खरं वागलात तरच लोक तुम्हाला पसंत करतात. शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि अब्दु रोजिक हे तिघेच बिग बॉसचे खरे खेळाडू आहेत.”

मात्र, आता विशालचे हे ट्विट त्याच्यावरच उलटले आहे. विशालचं हे ट्वीट पाहून सोशल मीडिया युझर्स भडकले आहेत. तू आहेस कोण ? घरातून बाहेर पड आधी मग तुला समजेल टीना काय आहे ते. अशा कॉमेंटपासून ते आता तुम्ही फुकटचे सल्ले नाही दिलेत तरच चांगले आहे. स्वतःच्या वेळी काय केलं असे म्हणत अनेकांनी या ट्वीटवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशाल कोटियनचं हे ट्वीट सध्या बरंच चर्चेत आहे. टीनाला ट्रोल करण्याच्या नादात विशाल स्वतःच ट्रोल झाला आहे.
दरम्यान, या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी सौंदर्या शर्मा, अर्चना गौतम आणि सुंबुल तौकीर यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. आणि साधारण महिना उलटून गेल्याने या शो मधील रंगत आणि मजा आणखी वाढणार हे निश्चित.

Vishal Kotian Controversial Statement on Actress Tina Dutta
Entertainment TV Reality Show Big Boss 16

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण आज; भारतात येथे दिसणार

Next Post

आजपासून केवळ ३ दिवस उघडे राहणार हे मंदिर…. वर्षभर राहते बंद… हे आहे कारण

Next Post
FB IMG 1667876981437

आजपासून केवळ ३ दिवस उघडे राहणार हे मंदिर.... वर्षभर राहते बंद... हे आहे कारण

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011