India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तीन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात… दोन वेगवेगळ्या कारवाया… आश्रमशाळा अधिक्षकासह तलाठी आणि कोतवालावर गुन्हा

India Darpan by India Darpan
April 7, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत तीन लाचखोर जाळ्यामध्ये सापडले आहेत. त्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक आश्रमशाळा अधिक्षक तर जळगावच्या रावेर तालुक्यातील खिरोदा येथील तलाठी आणि कोतवाल यांचा समावेश आहे. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एसीबीचे पथक करीत आहे.

आश्रमशाळेवर पाणी पुरवण्यासाठी लाच
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी येथील आदिवासी आश्रमशाळेचा लाचखोर अधिक्षक विवेक मधुकर शिंदे एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. लाचखोर शिंदे याने आश्रमशाळेवर टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून २० हजार रुपयांची लाच मागितली. आदिवासी विकास विभागाकडून या ठेकेदाराला पाणी पुरवठ्याची परवानगी मिळाली होती. हे आदेश काढून देणे आणि टँकरची ट्रीप अॅडजेस्ट करुन देण्यासाठी लाचखोर शिंदे याने २० हजाराची मागणी केली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार आली. एसीबीच्या पथकाने सापळा रचला. याप्रकरणी शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

तलाठी आणि कोतवाल यांच्यावरील कारवाई
रावेर तालुक्यातील खिरोदा येथील तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे (वय ४५ वर्ष) आणि कोतवाल शांताराम यादव कोळी (वय ५२ वर्ष) अशी लाचखोरांची नावे आहेत. त्यांनी ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. एका  शेतकऱ्याची वडीलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घ्यायचे होते. त्याच्या मोबदल्याततलाठी न्हायदे आणि कोतवाल कोळी यांनी ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्याची दखल घेत एसीबीच्या पथकाने सापळा रचला. आणि त्यात न्हायदे व कोळी हे रंगेहाथ सापडले. तलाठी कार्यालयात या दोघांनी लाच स्विकारली. याप्रकरणी न्हायदे आणि कोळी यांच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सापळा पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
सापळा व तपास अधिकारी-*
एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.
सापळा पथक-*
पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.
कारवाई मदत पथक-
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
*मार्गदर्शक
*1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 91 93719 57391
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*

Nashik Jalgaon ACB Raid Corruption Bribe Trap


Previous Post

इंदू मिल स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिल्लीत तयार; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

वकीलांना मारहाण करणे पडणार महागात; राज्यात लवकरच येणार हा कायदा

Next Post

वकीलांना मारहाण करणे पडणार महागात; राज्यात लवकरच येणार हा कायदा

ताज्या बातम्या

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, २९ मे २०२३चे राशिभविष्य

May 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – २९ मे २०२३

May 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीचे बर्थडे गिफ्ट

May 28, 2023

३५६ कोटी खर्च… मोदींच्या हस्ते उदघाटन…. महाकाल कॉरिडॉरच्या कामांचे पितळ उघड…. वादळाने मूर्ती कोसळल्या

May 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

कांदा प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदानासाठी मुदतवाढ?

May 28, 2023

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगारासाठी ‘ट्रान्सपोर्टचा एक्स्पो’ ठरला रेड कार्पेट; १२१ युवकांना आॅफर लेटर.. घसघशीत पगाराची नोकरी

May 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group