India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिककरांनो सावधान, झाड तोडताना चारदा विचार करा! अनधिकृत वृक्षतोड विरोधात १७ गुन्हे दाखल… २३ लाखांचा दंडही वसूल

India Darpan by India Darpan
March 16, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अनाधिकृत वृक्षतोडबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन वेळोवेळी कारवाई केली जाते. या मोहिमेची मनपाच्या सहा विभागात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवीत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार आहे.

1 फेबुवारीपासूनची आकडेवारी पाहता मनपाचे सहा विभाग मिळून एकूण 17 गुन्हे दाखल झाले आहेत. अनधिकृतपणे वृक्ष तोडणा-यांकडून 23 लाख 71 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. सर्वाधिक सहा गुन्ह्यांची नोंद पश्चिम विभागात झाली असून एकूण 6 लाख 65 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. पंचवटी विभागात सर्वात कमी एक गुन्हाची नोंद झाली असून एक लाख 75 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

मनपाच्या पथकाने रविवारी 12 मार्च रोजी सातपूर विभागातील आनंदवल्ली शिवारात 45 फुट उंचीचे गुलमोहराचे डेरेदार झाड तोडून लाकूड घेऊन जाणारे वाहन मोठ्या शिताफीने पकडले होते. त्यातील दोन टन वजनाचा लाकूडफाटा पथकाने ताब्यात घेतला आहे. उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष प्राधिकरण निरीक्षक किरण बोडके, आर. बी. सोनवणे, वैभव वेताळ, जगदीश लोखंडे, मुख्य माळी श्रीकांत इरनक यांचा सहभाग असलेल्या पथकाने ही कारवाई केली होती.

विभागनिहाय गुन्ह्यांची संख्या, दंड
नाशिक पश्चिम – 6 गुन्हे – 6 लाख 65 हजारांचा दंड
पंचवटी – 1 गुन्हा – एक लाख 75 हजारांचा दंड
नवीन नाशिक – 2 गुन्हे – 3 लाख 35 हजारांचा दंड
नाशिक पूर्व – 4 गुन्हे – 2 लाख 71 हजारांचा दंड
सातपूर – 2 गुन्हे – 3 लाख 40 हजारांचा दंड
नाशिक रोड – 2 गुन्हे – 5 लाख 85 हजारांचा दंड
एकूण – 17 गुन्हे – 23 लाख 71 हजारांचा दंड

नागरीकांना आवाहन
शहरातील नागरीकांनी, सोसायटीमधील रहिवाश्यांनी, प्लॉटधारकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्याकरीता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन रितसर परवानगी घेऊनच कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करुन दंड आकारण्यात येत आहे. तशी मोहिम शहरात राबवली जात आहे, असे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.

अनधिकृत वृक्षतोड विरोधात 17 गुन्हे दाखल, 23 लाख 71 हजारांचा दंड आकारला, वृक्ष प्राधिकरण विभागाची कारवाई

नाशिक शहरातील अनाधिकृत वृक्षतोडबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन वेळोवेळी कारवाई केली जाते. या मोहिमेची मनपाच्या सहा विभागात काटेकोरपणे अंमलबजावणी केली pic.twitter.com/2IaBeV6bPM

— mynmc (@my_nmc) March 14, 2023

Nashik Illegal Tree Cutting 17 FIR 23 Lakh Fine


Previous Post

चाळीसगाव तालुक्यात तांदळाचा साठा सापडल्याप्रकरणी काय कारवाई झाली? सरकार म्हणते…

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group