India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अनेकांचे गृहस्वप्न होणार पूर्ण! नाशकात उद्यापासून होमेथॉन प्रदर्शन; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते उदघाटन; नरेडको नॅशनल प्रेसिडेंट श्री.राजन बांदेलकर यांची प्रमुख उपस्थिती

India Darpan by India Darpan
December 21, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नरेडकोच्या ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शनाचा आज (२२ डिसेंबर) पासून शुभारंभ होत आहे.सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवीदराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)तर्फे २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते होणार असून नरेडको नॅशनल प्रेसिडेंट श्री.राजन बांदलकर यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड आणि समन्वयक जयेश ठक्कर यांनी दिली.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे,विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी गंगाधरन.डी, मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे,जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी असिमा मित्तल,आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड या उपस्थित राहणार आहेत.

आपल्या स्वप्नातील घर व्हावे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे त्यांना उपलब्ध होईल, अपार्टमेंट्स, शॉप्स, ऑफिसेस यासाठी स्मार्ट सिटी नाशिक मध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य संधी आहे.सर्वांना परवडणारी घरे या प्रदर्शनात असणार असून १५ लाखांपासून ते ४ कोटी रुपया पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.या प्रदर्शनामुळे रिअल इस्टेट आणि ग्राहक दोघांनाही फायदा होणार आहे.

“लिव्ह – इन्व्हेस्ट – ग्रो” हि नरेडकोची संकल्पना आहे. हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे सगळे प्रकल्प एकाच छताखाली ग्राहकांना नरेडकोच्या या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. “बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना इथे विशेष सवलती असतील, बँकिंग पार्टनर्स देखील ग्राहकांना विशेष सवलत देणार आहेत. स्पॉट बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक चांदीचं नाणं या ठिकाणी भेट मिळणार आहे जितके लोक एक्झिबिशन बघायला येतील त्यापैकी एका भाग्यवंताला दररोज दर तासाला तेजस्वी ज्वेलर्स तर्फ़े लकी ड्रॉ द्वारे चांदीचं नाणं मिळणार आहे”. प्रॉपर्टी व्यतिरिक्त याठिकाणी बांधकाम मटेरियल, इंटिरियर मटेरियलचे स्टॉल असणार आहे. विविध बँकांच्या स्कीम सवलती सुविधा इथे ग्राहकांना एकाचवेळी समजतील.

प्रदर्शनात नाशिक मुंबईतील नामवंत बिल्डर्सचे स्टॉल्स असून बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साहित्ये यांये स्टॉल्सही येथे असणार आहेत. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे दीपक चंदे असून सह प्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो,केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

डोंगरे वसतिगृह मैदानावर २२ ते २५ डिसेंबर पासून नागरीकांना खुले असून जास्तीतजास्त नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन नरेडकोचे सचिव सुनील गवादे,सह सचिव शंतनू देशपांडे यांनी केले आहे. “होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ “यशस्वी होण्यासाठी अविनाश शिरोडे, पुरुषोत्तम देशपांडे,राजेंद्र बागड भाविक ठक्कर,अश्विन आव्हाड, प्रशांत पाटील, नितीन पाटील, मयूर कपाटे, भूषण महाजन, श्रीहर्ष घुगे, प्रयत्नशील आहेत.

Nashik Homethon Real Estate Property Expo From Tomorrow
Naredco


Previous Post

विदेशी व अवैध मद्यसाठ्यावरील कार्यवाहीत ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

भारतीय सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ११ लाखाची फसवणूक; तोतया जवानाला अटक

Next Post

भारतीय सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ११ लाखाची फसवणूक; तोतया जवानाला अटक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group