नाशिक – शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत. तशी माहिती खुद्द भारतीय हवामानशास्त्र विभागानेच दिली आहे. गेल्या २४ तासात नाशिकमध्ये ६३.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीची नोंद थेट १६ डिसेंबर १९६७ या दिवशीची आहे. त्यावेळी नाशिकमध्ये ३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच, तब्बल ४४ वर्षांनंतर नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, आज व उद्या असे दोन दिवस नाशकात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे डिसेंबरमधील केवळ एकाच दिवसाची नाही तर संपूर्ण महिन्याचाच उच्चांकी पाऊस आता नोंदला जाईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1466267726142324736?s=20