India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात महिलांसाठी ६ दिवस आरोग्य तपासणी शिबीर; असा घ्या लाभ

मोफत पॅप स्मीयर व मॅमोग्राफी (स्तनांची सोनोग्राफी); स्रीरोग तज्ज्ञांची उपस्थिती

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी (SMBT) हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमार्फत महिलांसाठी भव्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर एसएमबीटी हॉस्पिटल नंदी हिल्स धामणगाव (ता. इगतपुरी) व नाशिक शहरातील मुंबई नाका येथील एसएमबीटी क्लिनिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. येत्या २३ जानेवारीपासून या शिबिरास सुरुवात होणार असून २८ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी प्रतिबंधात्मक तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे.

महिलांमधील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक महिला सततच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आजाराची लक्षणे बळावतात. यामुळे गर्भाशय, स्तनांशी निगडीत महिलांना त्रास जाणवत असेल तर त्यांनी तात्काळ या शिबिरात सहभागी होऊन आपली तपासणी करून घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

भारतात दर एक लाख लोकवस्तीत १०० कर्करोगग्रस्त व्यक्ती असे प्रमाण सांगण्यात येते. पन्नाशी, साठीनंतर कर्करोग होण्याची शक्यता अधिकच वाढते. महिलांमध्ये गर्भाशयाचे व स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कर्करोगाचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर तो बरा होऊ शकतो. सध्याच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या आजारातून अनेक रुग्ण बरे होऊ लागले आहेत. कर्करोग त्वचा, स्नायू, अस्थी, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो.

हा आजार लगतच्या भागांत वाढत जातो किंवा रक्त वा रसावाटे पसरू शकतो. भारतामध्ये काही प्रकारचे कर्करोग विशेष प्रमाणात आढळतात. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण थोडे बदलते. भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण-तोंडाचा अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागाशी संबंधित असतात असे तज्ञ सांगतात.

एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटचा टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरसोबत गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक करार झाला आहे. यामुळे मोठ्या संख्येने तज्ञ डॉक्टर याठिकाणी उपलब्ध झाले असून अनेक जटील शस्रक्रिया एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये पार पडलेल्या आहेत. अद्ययावत आणि अत्याधुनिक साधनसामुग्री याठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे खर्चिक समजल्या जाणाऱ्या अनेक शस्रक्रिया कमीत कमी खर्चात होत आहेत. या शिबिरात स्रीरोग तज्ञ डॉक्टरांची टीम आलेल्या महिलांची तपासणी करणार आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत पॅप स्मीयर (Pap smear) टेस्ट व स्तनांची सोनोग्राफी म्हणजेच मॅमोग्राफी केली जाणार आहे.

ही आहेत कर्करोगाची लक्षणे
अचानक रक्तपांढरी होणे. भूक मरणे. शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होणे. उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर रक्तस्राव होणे, स्तनांमध्ये गाठ, व्रण होणे, आवाज बदलणे, आवाज बसणे, खोकल्यातून रक्त पडणे, अन्न गिळताना अडकल्यासारखे वाटणे, पोट जड वाटणे, न पचलेले अन्न उलटणे, तोंडात न दुखणारा चट्टा, व्रण अथवा गाठ तयार होणे, लघवीतून किंवा शौचातून रक्तस्राव, बध्दकोष्ठतेची तक्रार, काखेत, जांघेत, गळयात, कडक गाठींचे अवधाण येणे ही लक्षणे असलेल्या रुग्णांनी अधिक माहितीसाठी आमच्या +91 91450 01630 क्रमांकावर संपर्क साधावा किंवा एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव आणि नाशकातील एसएमबीटी क्लिनिकला अवश्य भेट देऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
एसएमबीटी हॉस्पिटलमधील सुविधा
रुग्णांसाठी मोफत बससुविधा (नाशिक, कसारा व कल्याण येथून दरदिवशी)
पहिल्या तीन दिवसांचे औषधे मोफत

Nashik Health Check up Camp for Women


Previous Post

सुप्रिया सुळेंपाठोपाठ अजित पवारही बचावले! खुद्द त्यांनीच सांगितला हा भयानक किस्सा

Next Post

हवामान विभागाला हलक्यात घेऊ नका! सांगितले तसेच घडणार, हवामान अंदाज अचूक होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर

Next Post

हवामान विभागाला हलक्यात घेऊ नका! सांगितले तसेच घडणार, हवामान अंदाज अचूक होण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group