नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हयाच्या ग्रामिण भागातील दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायती साठी उद्या रविवारी मतदान होत आहे. जिल्हयातील १९६ ग्रामपंचायती पैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १८८ ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी आज तालूका स्तरावर निवडणूक कर्मचा-यांना प्रशिक्षण देत मतदान यंत्र व साहित्याचे वाटप करण्यात आले.चांदवड तालूक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत असल्याने त्याठिकाणी मोठी गर्दी कर्मचा-यांची झाली होती. थेट सरपंच पदासाठी व सदस्यांच्या निवडीसाठी अनेक गावांमध्ये मोठी चुरस असल्याच पहावयास मिळत आहे.