मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या गृहखात्याकडून आज पुन्हा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यापूर्वी मंगळवारी १३ डिसेंबर रोजी विविध आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. त्यात आता काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आजच्या आदेशात गृहविभागाने पुन्हा एकदा सुधारित पदस्थापनेचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, सुनील फुलारी यांची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर अशी करण्यात आली आहे. मात्र, नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकपदी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. तसेच, अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश खालीलप्रमाणे
IPS Officer Transfer Order By Home Ministry