बुधवार, नोव्हेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडींचा सिलसिला सुरूच; आता काय घडलं?

जानेवारी 15, 2023 | 1:50 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
satyajit sudhir tambe

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानपरिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये वेगळेच रंग बघायला मिळत आहेत. आजपर्यंत कधीही झाली नाही अशी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुक होऊ घातली आहे. भाजपने उमेदवारच दिला नाही. काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्जच भरला नाही. त्यांचे पुत्र सत्यजित यांनी अपक्ष अर्ज भरला. हे नाट्य घडल्यानंतर आता आणखी घडामोडी घडत आहेत. धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी मातोश्री गाठत ठाकरे गटासह महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविला आहे. तर, धनराज विसपुते हे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढू शकतात.

या निवडणुकीत २२ अपक्ष रिंगणात असून मोठ्या राजकीय पक्षांमधून बंडखोरी करून अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये खरी चुरस असणार आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज न भरता आपल्या मुलाला अपक्ष उभे केले असतानाच भाजपने तिकीट नाकारलेल्या उमेदवाराने आता अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या शुभांगी पाटील यांना पक्षाने उमेदवारीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी तयारी केली होती. शुभांगी पाटील यांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पदवीधरसाठी तयारी सुरू केली. त्यांच्यासाठी डॉक्टर्स, पदवीधर, शिक्षकांनी घरोघरी जाऊ सभासद करून घेतले, असा दावा त्यांनी स्वतःच केला आहे.

भाजपनेही आपल्या मेहनतीची दखल घेतली होती. पण आपलाच पक्ष सोबत नसल्याचे लक्षात आल्याने अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आता ही निवडणूक आपण लढविणारच आहे, असा निर्धार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे. शुभांगी पाटील या महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यात जवळपास ५४ तालुक्यांचा समावेश होतो. या एकूणच मतदारसंघात त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. विशेष म्हणजे भाजपने स्वतःचा उमेदवार जाहीर न करण्याचं काय कारण असावं, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

शुभांगी पाटील यांच्याविषयी
शुभांगी पाटील या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेमध्ये शिक्षिका आहेत. त्यांचे शिक्षण बीए, डीएड, एमए, बीएड, एललबी असे झाले आहे. महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनच्या त्या राज्य अध्यक्ष आणि संस्थापिका आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशनच्या त्या संस्थापक अध्यक्षही आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्या प्रमुख सल्लागार, नंदूरबारच्या मोलगी येथील ग्रामविकास मंडळाच्या सचिव, जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्था आणि धुळ्याच्या युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटीच्याही त्या अध्यक्ष आहेत.

भाजप कुणासोबत?
भाजपच्या शुभांगी पाटील यांनी अपक्ष निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे. भाजप काँग्रेसच्या उमेदवारासोबत असल्याचा आरोप शुभांगी पाटील यांनी अप्रत्यपणे केला आहे.

मातोश्रीचा पाठिंबा
शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर आश्रयासाठी थेट मातोश्री गाठली. ठाकरे गटाने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी ही निवडणुक बिनविरोध होऊ देणार नाही, असा निर्धारच व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीत त्यांनी पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर, काँग्रेसच्या उमेदवाराने येथे अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने आता नाशिकची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला देऊ केली आहे. म्हणजेच आता शुभांगी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असणार आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होणार आहे.

Nashik Graduate Constituency Election Politics Happening

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचे कौतुकास्पद यश… यंदाच्या स्पर्धेचे ही आहेत उल्लेखनीय वैशिष्ट्ये…

Next Post

पुण्यात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; सुदैवाने बचावल्या (बघा व्हिडिओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 11, 2025
crime1 1
इतर

नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच… एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….

नोव्हेंबर 11, 2025
IITF 2025
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत होणार भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 11, 2025
WhatsApp Image 2025 11 11 at 4.23.33 PM
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य… या विजेत्यांची झाली घोषणा…

नोव्हेंबर 11, 2025
Next Post
Supriya Sule e1699015756247

पुण्यात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; सुदैवाने बचावल्या (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011