India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

India Darpan by India Darpan
February 2, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सुरवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात ४९.३२ टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात २८ टेबलवर सुरू झाली आहे. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक,नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे उपस्थित होते.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आहे. राज्यातील सर्वात कमी म्हणजे ४९ टक्के मतदान नाशिक विभागात झाले आहे. त्यामुळे हे अत्यल्प मतदान कुणाला फायद्याचे ठरणार, कुणाला तोट्याचे ठरणार यासह इतर राजकीय चर्चांनाही वेग आला आहे. पहिल्यापासूनच नाशिकची निवडणूक राज्यभरात गाजली आहे. काँग्रेसने उमेदवारी देऊनही विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित यांनी अपक्ष अर्ज सादर केला. शेवटच्या क्षणाला हा हायव्होल्टेज ड्रामा रंगला. तर, देशातील सर्वात मोठा पक्ष असे बिरुद मिरविणाऱ्या भाजपने मात्र या निवडणुकीत उमेदवारच दिला नाही. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली आहे.

Nashik Graduate Constituency Counting Started


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

Next Post

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group