नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने याच दिवशी अतिशय उत्कंठावर्धक आणि नाट्यमय घडामोडी घडल्या. संपूर्ण राज्यात नाशिक पदवीधर निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरली. नाशिक पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेसने आज सकाळी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, डॉ. तांबे यांनी माघार घेत उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. मात्र, त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे. भारतीय जनता पक्षानेही शेवटच्या क्षणापर्यंत कुणाचीही उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार राहून त्यांना महाविकास आघाडी व भाजपचा पाठिंबा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारत निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक ३० जानेवारी २०२३ राेजी होणार आहे. डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य ७ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले आहेत. या रिक्त पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
पुत्रासाठी पित्याची माघार
काँग्रेसचे आमदार सुधीर तांबे हेच पुन्हा उमेदवार असतील असे सांगितले जात होते. मात्र, त्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी अर्ज भरलाच नाही. डॉ. तांबे यांचे पुत्र सत्यजित यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, त्याचीही घोषणा झाली नाही. अखेर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुत्र सत्यजितसाठी डॉ. तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. परिणामी, काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळूनही त्यांनी अर्ज न भरल्याने महाविकास आघाडीचा उमेदवारच निवडणुकीत नसल्याचे स्पष्ट होत आहे. ॉ
भाजप पाठिंबा देणार की
नाशिक पदवीधरच्या रिंगणात महाविकास आघाडीचा उमेदवारच नाही. शिवाय भाजपनेही कुणालाच उमेदवारी दिलेली नाही. आता सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्याने तेच महाविकास आघाडी आणि भाजपचे उमेदवार राहणार का, तांबे यांची बिनविरोध निवड होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
https://twitter.com/_prashantkadam/status/1613470706037317632?s=20&t=NglWA2PI0-TQ4fpUw1qI6g
निवडणूक कार्यक्रम असा :
गुरुवार दि. ५ जानेवारी २०२३ रोजी या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध. गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. १३ जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, सोमवार दि. १६ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होईल.
https://twitter.com/INCSandesh/status/1613411557115072512?s=20&t=-8olaox3834YDrd60ZKaTw
महाविकास आघाडीची निश्चिती
नाशिक – काँग्रेस – डॉ. सुधीर तांबे
अमरावती – काँग्रेस
औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेस
नागपूर – शिवसेना
कोकण – शेतकरी कामगार पक्ष
हे आहेत भाजपचे उमेदवार
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ – डॉ. रणजित पाटील
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ – किरण पाटील औरंगाबाद
कोकण विभाग शिक्षक मतदार संघ – ज्ञानेश्वर म्हात्रे
Vidhan Parishad Election Nashik Graduate Candidates not Declared
Satyajit Tambe Sudhir Tambe Congress BJP
Ahmednagar North Maharashtra
Nashik Graduate Constituency Candidate Suspense Thrill Politics