India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गोपीनाथ गड लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री, गडकरी व अन्य मंत्री; देवेंद्र फडणवीस का नाहीत? चर्चांना उधाण

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुक्यातीस नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यात पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, हेमंत गोडसे आदी उपस्थित राहणार आहेत. मात्र, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दोन एकराच्या तळ्यात उभे राहिले आकर्षक स्मारक
नांदूरशिंगोटे येथे गावालगत दोन एकराच्या तळ्यात साठवणीचे पाणी राहत होते. या तळ्यालाच आकर्षक रूप देण्यात आले आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा १६ फूट उंचीचा ब्रांझचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.
आकर्षक विद्युत रोषणाई, तळ्याभोवती जॉगिंग ट्रॅक, बगीचा, परिसरात झालेली सुशोभीकरणाची कामे यामुळे स्मारकाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. युवानेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभे राहिले. त्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नाईक संस्थेचे हेमंत धात्रक यांचे मार्गदर्शन लाभले.

या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. युवा नेते उदय सांगळे, मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, सरपंच रवींद्र पवार ,पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, माजी नगरसेवक मनोज भगत, शैलेश नाईक, विनायक शेळके, विठ्ठल राजेभोसले, भजूनाथ शिरसाट, देविदास वाजे, सरपंच अरुण वाघ यांनी केले आहे.

म्हणून फडणवीस येणार नाही
देवेंद्र फडणवीस यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी अन्य कार्यक्रमांना वेळ दिली होती. त्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकणार नाहीत, असे आयोजकांनी सांगितले आहे. मात्र, फडणवीस यांनी मुद्दामच या कार्यक्रमाला वेळ दिला नाही की अन्य काही कारण आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

राजकीय चर्चा गरम
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. तसेच, त्यांना विधान परिषदेवरही संधी देण्यात आलेले नाही. त्यांना सातत्याने डावलले जात असल्याचे बोलले जाते. यासंदर्भात अप्रत्यक्षरित्या पंकजा यांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखविली आहे. यामुळेच फडणवीस यांना या कार्यक्रमाला बोलविण्यात आले नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहेत.

Nashik Gopinath Munde Memorial Devendra Fadnavis Absent Politics


Previous Post

अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित; जे पी गावित यांची घोषणा… असा असेल शेतकऱ्यांचा परतीचा प्रवास

Next Post

मुंबई – नाशिक महामार्गावर वाडिव-हे फाट्याजवळ ऑल्टो व ट्रकचा भीषण अपघात; एक जण गंभीर जखमी

Next Post

मुंबई - नाशिक महामार्गावर वाडिव-हे फाट्याजवळ ऑल्टो व ट्रकचा भीषण अपघात; एक जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group