नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी नदीचे पावित्र्य जपून तिचे संवर्धन करण्यासाठी अयोध्या, हरिद्वार, वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी नदीच्या काठावर ‘गोदावरी आरती उपक्रम’ महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी या उपक्रमात सहभागी होवून नागरिकांनी गोदावरी आरती उपक्रमाबाबत सूचना व अभिप्राय 31 मार्च 2023 पर्यंत नोंदवावे, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
गोदावरी आरती उपक्रमात लोकसहभाग महत्वाचा असून सुजाण नागरिक म्हणून येणाऱ्या पिढीला निर्मळ स्वच्छ गोदावरी नदीचे रूप दाखविणे आवश्यक आहे. त्याकरीता शासकीय- निमशासकीय संस्था, शाळा, संगीत व कला प्रशिक्षण संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक, कलावंत तसेच खाजगी संस्था यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी गोदावरी आरतीचे बोल तसेच आरतीच्या अनुषंगाने इतर काही बाबी, सूचना व अभिप्राय असल्यास ते collector.nashik@maharashtra.gov.in , pwdivisionnashik@gmail.com या ईमेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना पेटीत 31 मार्च 2023 पर्यंत द्यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
Nashik Godavari Project Suggestion Invited