India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांचा नाशिक, नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन

India Darpan by India Darpan
March 17, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज सकाळी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत, असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्या भागात देखील पंचनामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

#अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचे #पंचनामे सुरु आहेत, जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल पाठविण्याचे काम सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वत: बोललो आहे, असे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी विधानसभेत सांगितले. सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे – मुख्यमंत्री pic.twitter.com/ofXKIR5NsG

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 17, 2023

CM Eknath Shinde Call to Nashik Nanded Collector
Unseasonal Rainfall


Previous Post

अयोध्या, काशीच्या धर्तीवर गोदावरी आरती कशी हवी? तत्काळ तुमच्या सूचना येथे पाठवा

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा; अमरावतीसह देशातील ५ ठिकाणी होणार हा मेगा प्रकल्प

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा; अमरावतीसह देशातील ५ ठिकाणी होणार हा मेगा प्रकल्प

ताज्या बातम्या

मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या बरोबर कांदा प्रश्नावर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा नाही….

September 26, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि बंताची चर्चा

September 26, 2023

आनंद महिंद्रा अडचणीत…याप्रकरणी गुन्हा दाखल

September 26, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींना नवीन संधीचा योग येईल… जाणून घ्या, बुधवार, २७ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 26, 2023

दुर्दैवी घटना….मनमाडला पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू

September 26, 2023

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group