नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाने पंचवटी येथील मे. त्रिमूर्ती फूडस अँण्ड बेव्हरेजेस या पॅकेज ड्रिंकिंग वॉटर उत्पादन करणाऱ्या पेढीवर धाड टाकली. या ठिकाणी पॅकेज ड्रिंकिंग वॉटर १ लिटर बॉटल व पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ५०० मिली वॉटर उत्पादित करीत असल्याचे आढळले परंतु त्यांच्या लेबल वर उत्पादनाचे ठिकाण जळगाव असे नमूद केलेले होते.
त्याचप्रमाणे वेगवेगळे FSSAI परवाना क्रमांक आढळल्याने अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी सदरचा साठा हा प्रथमदर्शनी मिथ्या छाप व लेबल दोष असल्याने त्याचा शिल्लक साठा २९१६ लिटर किंमत रुपये ५३ हजार ५३० रुपयाचा हा जप्त केला. यावेळी नमुने घेऊन अन्न विश्लेषण प्रयोगशाळा येथे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले, अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाने दिली. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात वाढ झाल्याने मार्केटमध्ये शीतपेय थंड पदार्थ तसेच पॅकेज ड्रिंकिंग वॉटरची मागणी वाढते त्यावर प्रशासनामार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून २७ एप्रिल रोजी ही धाड टाकण्यात आली.
त्याचप्रमाणे अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी सिडकोतील बडदे नगर येथे मे. मसाला स्ट्रोक न्यूट्रिशन या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी उत्पादित केलेले पीनट बटर (डार्क चॉकलेट) चा नमुना घेऊन त्याचा शिल्लक साठा ७ जार किंमत रुपये १ हजार ७५० रुपयाचा साठा हा लेबल दोष विना परवाना विना नोंदणी उत्पादन व सदर जागेत उत्पादनासाठी लागणारे कुठले साहित्य नसल्याने भेसळीच्या संशयावरून जप्त केला.सदर प्रकरणी घेतलेली नमुने हे अन्न विश्लेषण विश्लेषण प्रयोगशाळा येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली.
सदरच्या दोन्ही कारवाई सहआयुक्त नाशिक विभाग सं. भा. नारागुडे यांचे मार्गदर्शनाखाली मनीष सानप सहाय्यक आयुक्त व अमित रासकर, प्रमोद पाटील व अविनाश दाभाडे अन्नसुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने घेतली.
Nashik FDA Packaged Drinking Water Chocolate Seized