India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिकच्या दुर्गेश नंदिनीची मधूर धून २६ जानेवारीच्या परेडमध्ये दुमदुमणार

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविडमुळे नाशिकहून राजस्थानला शिक्षणासाठी गेलेली दुर्गेश नंदिनी अभिमन्यू राठोड यंदाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथवर पाहुण्यांसमोर सॅक्सॉफोन या बँड पथकातील वाद्याद्वारे वाजवल्या जाणाऱ्या मधुरधुनीची साक्षीदार असणार आहे.

इंदिरानगर मध्ये राहणाऱ्या अभिमन्यू सिंह राठोड यांची कन्या दुर्गेश नंदिनी ही नवव्या इयत्तेत राजस्थानमधील बिट्स पिलानी अर्थात
बिर्ला बालिका विद्यापीठ या शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून शिक्षण घेत आहे. या शाळेच्या एनसीसी मधील कॅडेटसला दरवर्षी प्रजासत्ताक दिनी परेड मध्ये सहभागी होऊन बँड वाजवण्याची संधी मिळते.

पं. जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदी असताना या शाळेला भेट दिली असता, त्यांनी विद्यार्थिनींची मेहनत लक्षात घेऊन या परेड सोहळ्यात ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धुन वाजवण्यासाठी कायमस्वरूपी निमंत्रित केले आहे. दरवर्षी या शाळेच्या विद्यार्थिनी 26 जानेवारी च्या बँड पथकात सहभागी होतात. त्यासाठी त्यांना अभ्यास सांभाळून दिल्लीमध्ये एक महिन्याचा खडतर सराव करावा लागतो.

कोविड -19 मुळे गेली दोन वर्ष मुलींचे एनसीसी बँड पथक परेडमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. एनसीसीच्या 51 कॅडेट – विद्यार्थिनी यंदा या बँड पथकात असतील. इंदिरानगर व्हिस्टा अपार्टमेंट मध्ये दुर्गेशनंदिनीच्या पालकांचे वास्तव्य आहे. ती मागील वर्षी पर्यंत फ्रावशी शाळेची विद्यार्थिनी होती. या बँड पथकाचा दिल्लीत कडाक्याच्या थंडीत सकाळी पाच वाजता सराव होत आहे. नुकतेच लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी या पथकाच्या सरावाचे निरीक्षण केले.

Nashik Durgesh Nandini 26 Jan Parade Saxophone
Performance Student Girl


Previous Post

धक्कादायक! पतीने गळफास घेतला… मृतदेह तब्बल २९ दिवस फासावरच लटकलेला होता… पत्नी घरी येताच…

Next Post

तलवारीसह गुप्ती घेवून परिसरात दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी केले गजाआड

Next Post

तलवारीसह गुप्ती घेवून परिसरात दहशत माजविणा-या दोघांना पोलिसांनी केले गजाआड

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group