नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधिक्षक (एसपी) शहाजी उमाप हे स्वतः पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यामुळेच एकाच दिवशी जिल्ह्याच्या विविध भागात तब्बल ३१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. उमाप यांनी अवैध धंद्यांवर मास रेडचे आयोजन केले. ग्रामीण भागात ३१ ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत जवळपास साडेपाच लाख रुपयांची दारु, रसायन नष्ट करण्यात आली आहे. तसेच, ३७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सटाणा तालुक्यातील १२ ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली त्याच प्रमाणे जिल्ह्यातील अन्य तालूक्यातील अनेक गावात ही कारवाई करण्यात आली आहे. या पुढे ही असीच कारवाई सुरु राहणार असल्याच जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. याअगोदर मे महिन्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शना खाली मोठी कारवाई करण्यात आली होती. एकाच दिवशी आणि एकाचवेळी जिल्ह्यात विविध तब्बल ४६ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. खासकरुन ही कारवाई अवैध गावठी दारु अड्डे उद्धवस्त करण्यासाठी होती.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, सुरगाणा, पेठ, इगतपुरी, देवळा व सटाणा तालुक्यातील विविध अवैध दारु अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकांनी हे छापे टाकले होते. दारुसाठी लागणारा काळा गुळ व नवसागरचा मोठा पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केला . एकाच दिवशी केलेल्या कारवाईं मध्ये जवळपास १० लाखाचे दारु, रसायन साहित्य जप्त करण्यात आले होते. आता ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
बघा कारवाईचा हा व्हिडिओ
nashik district sp shahaji umap 31 raid illegal business
Raids at 1 place, action against 37 people, liquor worth five and a half lakhs destroyed
Rural police Superintendent