नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सन 2022 या वर्षाकरिता नाशिक जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढीलप्रमाणे जाहीर केल्या आहेत. 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना. या स्थानिक सुट्टया न्यायालयीन विभाग वगळून सर्व शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थाना लागू असतील, अशी माहिती उप आयुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे यांनी दिली आहे.
अन्य सरकारी सुट्या अशा
2022 या वर्षांत काही सार्वजनिक सुट्ट्या रविवारी आल्यामुळे नोकरदारांमध्ये निराशा हे. रविवार वगळता 2022 मध्ये 17 सुट्ट्या आहेत. तर यंदा 52 रविवार आले आहेत. म्हणजेच यंदा एकूण 69 सरकारी सुट्ट्या आहेत.
२०२२ मधील सरकारी सुट्यांची यादी अशी
जानेवारी
दि. 26 जानेवारी, बुधवार – ‘प्रजासत्ताक दिन तर दि 2, 9, 16, 23, 30 रोजी रविवार आहेत.
फेब्रुवारी
दि.19 फेब्रुवारी शनिवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती तर 6, 13, 20, 27 रोजी रविवार आहेत.
मार्च
दि. 1 मार्च, मंगळवार – महाशिवरात्री तर 18 मार्च, शुक्रवार – धुलीवंदन आणि दि. 6,13, 20, 27 रोजी रविवार आहेत.
एप्रिल
दि.2 एप्रिल, शनिवार – गुडीपाडवा तर 14 एप्रिल, गुरुवार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती, तसेच 15 एप्रिल, गुरुवार – गुड फ्रायडे आहे.आणि दि. 3,10,17, 24 रोजी रविवार आहेत.
मे
दि. 3 मे, मंगळवार – अक्षय तृतीया, रमजान ईद तर 16 मे, सोमवार – बुद्धपौर्णिमा आणि दि. 1, 8,15, 22, 29 रोजी रविवार आहेत.
जून
एकही सरकारी सुट्टी नाही. मात्र 5,12,19,26 रोजी रविवार आहेत.
जुलै
एकही सरकारी सुट्टी नाही मात्र दि. 3,10,17, 24, 31 – रविवार आहे
ऑगस्ट
दि.9 ऑगस्ट, मंगळवार – मोहरम, 15 ऑगस्ट, सोमवार – स्वातंत्र्य दिन, 16 ऑगस्ट, मंगळवार – पारशी नववर्ष, 31 ऑगस्ट, बुधवार – श्रीगणेश चतुर्थी तर दि. 7,14,21,28 – रविवार
सप्टेंबर
एकही सरकारी सुट्टी नाही, 4,11,18,25 – रविवार .
ऑक्टोबर
5 ऑक्टोबर, बुधवार – दसरा, 24 ऑक्टोबर, सोमवार – लक्ष्मीपूजन, 26 ऑक्टोबर, बुधवार- दिवाळी पाडवा व भाऊबीज तर 2,9,16,23,30 – रविवार
नोव्हेंबर
8 नोव्हेंबर, मंगळवार – गुरु नानक जयंती तर 6,13,20,27 – रविवार आहे.
डिसेंबर
14,11,18,25 – रविवार
रविवारी आलेल्या सरकारी सुट्या अशा
10 एप्रिल – राम नवमी
1 मे, – महाराष्ट्र दिन
2 ऑक्टोबर – गांधी जयंती
9 ऑक्टोबर – ईद
25 डिसेंबर – ख्रिसमस.