India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

१००० ढोल.. २०० ताशे.. १५०० वादक… एकच लय.. एकच हुंकार.. महावादनाने निनादला नाशिकचा गोदाघाट (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात शनिवारी भव्य दिव्य महावादन झाले. तरुणवर्गाचे आकर्षण असलेला ढोल-ताशा वादनाचा महोत्सव या वर्षी ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून, या ३५० व्या हिंदू साम्राज्य स्थापना वर्षाच्या निमित्ताने’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आला.

एकूणच सकारात्मक ऊर्जेने ‘मी’ चे ‘आम्ही’ मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समिती तर्फे फाल्गुन कृ. ११, शनिवार, १८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६ वा पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी, नाशिक येथे “महावादन” हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल १००० युवाशक्तींनी सामूहिक ढोल ताशा वादन सादर केले. यावेळी नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार राहुल ढिकले, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, मनपा जनसंपर्क अधिकारी गिरीष निकम, नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे हे मंचावर उपस्थित होते. सन २०१६ पासून नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे दरवर्षी महावादनाचा कार्यक्रम घेतला जात आहे.यावर्षी या महावादनाचं हे ७ वं वर्ष असून नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांमध्ये प्रेम , बंधुभाव आणि एकोपा हि भावना निर्माण व्हावी या उद्देशाने तब्बल जिल्ह्यातील ३० ढोल पथकांशी संपर्क साधून या महावादनाचे आयोजन करण्यात आले होते.

एकूणच या महावादनात १००० ढोल , २०० ताशे आणि १५०० वादक आणि झांज वादकांच्या सहभागातून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली गेली. या आयोजनात १०० स्वयंसेवकांनी काम केले आहे. या वर्षी शिवतांडव ढोल ताशा पथकाचे प्रमुख मिलिंद उगले हे या महावादनाचे प्रमुख होते. या सर्व तीस पथक प्रमुखांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.

ध्वजप्रणाम करत भारत माता कि जय या घोषणेने महावादन कार्यक्रमाची सुरवात झाली त्यानंतर पहिला हात मग पाचवा हात यांचे वादन करण्यात आले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ साहेब यांची गारद देण्यात आली, त्यानंतर शिवस्तुतीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी माननीय आयुक्त व आमदार ढिकले यांनी ढोल पथकाचे निरीक्षण करून वादकांचे कौतुक केले. काही तरुण – तरुणी व बाल वादकांच्या कौशल्याला दाद दिली.

त्यानंतर शरयु व्यास यांनी सामूहिक वंदे मातरम म्हणून कार्यक्रम संपन्न झाला. तब्बल दीड तास चाललेल्या या महावादनाने गोदातीर अक्षरशः दुमदुमून गेला होता या कार्यक्रमाद्वारे खूप मोठ्या संख्येने नाशिककरांनी उपस्थित राहून तब्बल दीड ते दोन तास ब्रह्मनादाचा अनुभव घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कापसे यांनी केले. यावेळी शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, योगेश गर्गे, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दिपक भगत यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमात उद्या:
रविवार १९ मार्च २०२३ रोजी ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ यांना समर्पित “अंतर्नाद” (१५०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण, सायंकाळी ६ वाजता). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या विविध वाद्यांचे वादक, गायक व नृत्य कलाकार असे १५०० पेक्षा जास्त कलाकार एकत्र येऊन सामुहिकरित्या अंतर्नाद हा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना रसिक नाशिककर नागरिकांनी मोठया प्रमाणात उउपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.

नाशिक : बाराशे ढोल ताशे आणि पंधराशे वादकांमुळे निनादला गोदाघाट pic.twitter.com/8rGKeyFvke

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 18, 2023

Nashik Dhol Godaghat Navvarsha Svagat Samiti Mahavadan


Previous Post

या मराठी अभिनेत्रीकडे चाहत्याने केली सेक्सी व्हिडीओची मागणी

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – सारे एकाच ध्येयाच्या दिशेने

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - सारे एकाच ध्येयाच्या दिशेने

ताज्या बातम्या

आजपासून सुरू झाले हिंदू नववर्ष; यंदा आहेत १३ महिने, जाणून घ्या याविषयी सर्व काही…

March 22, 2023

बागेश्वर बाबा म्हणतात, मुंबईचे नाव आता हे हवे; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group