India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

या मराठी अभिनेत्रीकडे चाहत्याने केली सेक्सी व्हिडीओची मागणी

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपटसृष्टीतील कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. आपल्या व्यावसायिक तसेच व्यक्तिगत आयुष्यातील अनेक अपडेट्स ते आपल्या चाहत्यांना याच माध्यमातून सातत्याने देत असतात. मात्र, यातूनच या कलाकारांना अनेक त्रासदायक माणसांना तोंड द्यावे लागते. नुकताच याचा अनुभव अभिनेत्री सुरभी भावे हिला आला. तिने याबाबतची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

मराठी अभिनेत्री सुरभी भावे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुरभी ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असते. नवीन प्रोजेक्टबाबत माहिती देण्यासोबतच सुरभी कुटुंबियांबरोबरचे फोटोही शेअर करत असते.
सुरभीला नुकताच एका नेटकऱ्याकडून नाहक त्रास झाला. चाहत्याने सुरभीकडे एका व्हिडीओची मागणी केल्याचं समोर आलं आहे. याबाबत अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. एका नेटकऱ्याने सुरभीला इन्स्टाग्रामवर मेसेज करत “सेक्सी व्हिडीओ पाठव. तुला आवडतात का मी पाठवलेले व्हिडीओ” असा मेसेज केला होता. या नेटकऱ्याला सुरभीने सडेतोड उत्तर दिलं आहे. “तुझ्या आईला असे व्हिडीओ पाठव. त्यांना आवडले तर मी बघेन. याबाबत मी सायबर पोलिसांना कळवलं आहे”, असा रिप्लाय सुरभीने दिला आहे. सुरभीने या मेसेजचा स्क्रीन शॉट देखील शेअर केला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. या व्यक्तीने आधीही अनेकदा अश्लील व्हिडीओ पाठवल्याचं सुरभीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. “ह्यांनी मला अनेकवेळा अश्लील विडिओ पाठवले. पण मी सतत दुर्लक्ष केले. पण ह्या दोन दिवसांत पुन्हा पाठवले. मग मी रिप्लाय दिला ,जो रिप्लाय दिला तो सुद्धा ह्यात आहे…त्यांच्या आईचा ह्यात अवमान करणे हा उद्देश नव्हता, पण त्यांना झोंबल ते…अशा समस्त पुरुष वर्गाला सांगते, तुमची आई बहिण ही स्त्री आणि बाकी बायका काय तुमच्या मालकीच्या असतात का नीच लोकहो?? इथून पुढे असे मेसेजेस केले तर प्रत्येकाला असंच स्क्रीनशॉट पोस्ट करून सामाजिक ना** केले जाईल ह्याची नोंद घ्यावी. P.S. ह्याहून मला सभ्य भाषा वापरता येत नाही”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुरभीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. ‘स्वामिनी’ या मालिकेतून सुरभी घराघरात पोहोचली. ‘पावनखिंड’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांत सुरभीने भूमिका केल्या आहेत. सध्या ती ‘३६ गुणी जोडी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Surabhi Bhave (@surabhibhave)

Marathi Actress Surabhi Bhave Fan Demand Sexy Video


Previous Post

असा असेल तुमचा रविवारचा दिवस; जाणून घ्या, १९ मार्च २०२३चे राशिभविष्य

Next Post

१००० ढोल.. २०० ताशे.. १५०० वादक… एकच लय.. एकच हुंकार.. महावादनाने निनादला नाशिकचा गोदाघाट (व्हिडिओ)

Next Post

१००० ढोल.. २०० ताशे.. १५०० वादक... एकच लय.. एकच हुंकार.. महावादनाने निनादला नाशिकचा गोदाघाट (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नोटा मोजता मोजता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फुटला घाम; अखेर मागवले मशिन

March 22, 2023

खुशखबर! आता खासगी बसमध्येही महिलांना अर्धे तिकीट; ट्रॅव्हल्स कंपन्यांचा निर्णय

March 22, 2023

गांजाचा अवैध व्यापार करणाऱ्यांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

March 22, 2023
प्रातिनिधीक फोटो

दहावीनंतरच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नक्की किती? केंद्र सरकारने केला खुलासा

March 22, 2023

शेतकऱ्याने उभारली कांदा, द्राक्षाची अनोखी गुढी; मागण्यांचे फलक लावून वेधले सरकारचे लक्ष

March 22, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

संतापजनक! ध्रुवनगरमधील ‘त्या’ चिमुकलीची हत्या नक्की कुणी केली? पोलिस तपासात समोर आली अतिशय धक्कादायक माहिती

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group