India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बिनखांबी रंगमंडप… १ लाख टन मकराना संगमरवरी दगड… नाशकात साकारले देशातील पहिलेच अनोखे मंदिर…

India Darpan by India Darpan
February 24, 2023
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वामीनारायण मंदिरापाठोपाठ नाशकात आणखी एक मोठे, देखणे आणि भव्य असे मंदिर साकार झाले आहे. देवळालीत ‘कलापुर्णम तीर्थधाम’ हे ते मंदिर आहे. आणि आता ते नाशिककरांसाठीही खुले झाले आहे. या मंदिराची अनेकविध वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच या मंदिराची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे.

देवळाली हा अतिशय रम्य परिसर आहे. देवळालीच्या लॅमरोड भागात जैन धर्मिंयानी ‘कलापुर्णम तीर्थधाम’ साकारले आहे. गेल्या सात वर्षांपासून या मंदिराचे काम सुरू होते. २४ तीर्थकांराचे ३० हजार चौरस फुट जागेत हे मंदिर साकारण्यात आले आहे. ८१ X ८१ चौरस फुटाचे बिनखांबी रंगमंडप असलेले हे देशातील पहिलेच मंदिर आहे.

लॅमरोड येथे जैन धर्मियांचे सर्वाधिक आरोग्यधाम आहेत. आता येथे कलापुर्णम तीर्थधामची भर पडली आहे. मुंबईस्थित गुणोपासक परिवार ट्रस्ट यांनी जैन अध्यात्मयोगी संत आचार्य कलापुर्णमसुरीश्वरजी यांच्या आशीर्वादाने व प्रवचन प्रभावक आचार्यदेव श्री तत्वदर्शनसुरीश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेने हे मंदिर साकारण्याचे निश्चित केले. लॅमरोडवर तब्बल ६० हजार चौरस फूट जागेमध्ये दोन मजली भव्य दिव्य असे हे मंदिर साकारण्यात आले आहे. तब्बल १ लाख टन पेक्षा अधिक मकराना संगमरवरी दगडात हे कलापुर्णम तीर्थधाम देरासर साकार झाले आहे.

गेल्या ७ वर्षांपासून १५० पेक्षा अधिक कारागीर हे मंदिर साकारत होते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, जैन धर्माचे मुलनायक मुनिसुव्रत स्वामी यांचीभव्य मूर्ती मुख्य गाभाऱ्यात असणार आहे. आणि ३६० अंशामध्ये उर्वरित २३ तीर्थकरांचे दर्शन होणार आहे. मंदिराच्या छतावर साकार करण्यात आलेल्या कलाकुसरीत एकही डिझाईन दुसऱ्यांदा वापरण्यात आलेली नाही. त्यासोबत आतदेखील संगमरवरी दगडावर कलाकुसर साकारलेली आहे.

जैन धर्मात शनी देवतेला स्थान आहे. शनी देवतेचे अधिपती म्हणून भगवान मुनिसुव्रत स्वामी हे प्रख्यात आहे. त्यामुळे या कलापुर्णम तीर्थधाममध्ये दर शनिवारी विशिष्ट पूजाविधी केली जाणार आहे. ही पूजाविधी करण्यासाठी येथे देशभरातून भाविक येणार आहेत. येत्या ३ मार्च रोजी एका विशिष्ट मुहूर्तावर या मंदिरात अंजनशलाका प्रतिष्ठा महामहोत्सव (प्राणप्रतिष्ठा) सोहळा होणार आहे.

Nashik Deolali Kalapurna Tirthadham Temple


Previous Post

राज्य कर्मचारी संघटनेचा १४ मार्चपासून बेमुदत संप; आज जिल्हाधिका-यांना दिले निवेदन

Next Post

मालेगावमध्ये यंत्रमाग कारखान्याच्या गो़डाऊनला आग; लाखोंचे नुकसान

Next Post

मालेगावमध्ये यंत्रमाग कारखान्याच्या गो़डाऊनला आग; लाखोंचे नुकसान

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group