India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक ढोलमुळे दुमदुमणार गोदातीर; तब्बल एक हजारांहून अधिक ढोलचे आज सायंकाळी महावादन

India Darpan by India Darpan
March 18, 2023
in साहित्य व संस्कृती
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक व नाशिक महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीपासून संस्कृती जपणारे विविध सामुहिक कार्यक्रमांना आज संध्याकाळपासून सुरवात होत आहे, आज पहिल्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून” या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांचे एकत्रित ‘महावादन’ (१००० ढोलांचे समूह वादन) छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी ‘पाडवा पटांगणावर’ गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीपासून संस्कृती जपणारे विविध सामुहिक कार्यक्रम घेण्यात येतात. कार्यक्रमाचे उददेश हे आपल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि दर्शन हा असतो. कार्यक्रमाचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता जनजाती पुनरुत्थान इत्यादी राहिलेले आहेत. यंदाच्या वर्षी “पर्यावरण रक्षण (पंचमहाभूते)” हा विषय घेऊन राष्ट्रीय विकास मंडळ संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती व नाशिक महानगरपालिकाही सज्ज झाली आहे.

त्या अनुषंगाने, फाल्गुन कृ. ११, शनिवार १८ मार्च २०२३ रोजी “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून, या ३५० व्या हिंदू साम्राज्य स्थापना वर्षाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांचे एकत्रित ‘महावादन’ (१००० ढोलांचे समूह वादन, सायंकाळी ६ वाजता), छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. आज होणाऱ्या या महावादनात एकूण ३० पथके सहभागी होणार असून १००० ढोल व २०० ताशे असणार आहेत, कार्यक्रमात सुरवातीला सलग ४५ मिनिटे महावादन सादर होईल त्यानंतर गारद व सामुहिक शिवस्तुती सादर केली जाईल मग सामूहिक वंदे मातरम म्हणून कार्यक्रम संपन्न होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘नाशिक शहर पोलीस आयुक्त, अंकुश शिंदे व उपजिल्हाधिकारी, भूसंपादन नाशिकचे गणेश मिसाळ’ हे उपस्थित राहणार आहेत आहे.

नाशिक नगरीतील सर्व ढोल पथक एकत्र येऊन महावादन हा सामुहिक ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम साकारत असतात. ढोलाच्या नादातून मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जा तयार होत असते. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत हे सकारात्मक उर्जेने व्हावे हा उददेश असतो. तरुण तरुणींमध्ये या कार्यक्रमाचे प्रचंड आकर्षण आहे व त्यांचा या महावादनात लक्षणीय सहभागही आहे. तरी आज होणाऱ्या या महावादन कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी, महावादन प्रमुख मिलिंद उगले व रोहित गायधनी यांनी केले आहे.

आज शनिवार १८ मार्च २०२३ रोजी, महावादन १००० ढोलांचे समूह वादन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून, या ३५० व्या हिंदू साम्राज्य स्थापना वर्षाच्या निमित्ताने सायंकाळी ६ वाजता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण pic.twitter.com/evskKH1WrL

— Prasad Garbhe 🇮🇳 (@Prasad_garbhe) March 18, 2023

Nashik Cultural 1 Thousand Nashik Dhol Mahavadan Today


Previous Post

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे नाशकात मार्गदर्शन क्लिनिक; सोमवार ते शनिवार याठिकाणी मिळणार मोफत सेवा

Next Post

धक्कादायक! डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी परस्पर बँकेत उघडले खाते… तब्बल ६ कोटींचा घोटाळा… असे झाले उघड

Next Post

धक्कादायक! डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी परस्पर बँकेत उघडले खाते... तब्बल ६ कोटींचा घोटाळा... असे झाले उघड

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group